पहिलाच सामना रद्द… पाकिस्तानचं सेमीफायनलचं दार कायमचं बंद? कसं आहे समीकरण?
T20 विश्वचषक 2026 मध्ये उपांत्य फेरीसाठी पाकिस्तान पात्रता परिस्थिती : टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेतील सुपर-8 फेरी आता अत्यंत रोमांचक टप्प्यात पोहोचली आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रुप-2 मधील पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार होता. मात्र सततच्या पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही आणि सामना रद्द घोषित करण्यात आला. परिणामी दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आले. या निकालामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. कारण सुपर-8मध्ये प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा असतो आणि आता सेमीफायनलची वाट त्यांच्यासाठी अधिक कठीण झाली आहे.
पाकिस्तान सेमीफायनलमध्ये कसा पोहोचू शकतो?
सुपर-8 फेरीत प्रत्येक संघ तीन सामने खेळतो. त्यानंतर गटातील अव्वल दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतात. या टप्प्यावर कोणतेही गुण पुढे नेले जात नाहीत, सर्व संघ शून्य गुणांपासून सुरुवात करतात. पाकिस्तानचा एक सामना रद्द झाल्याने त्यांच्याकडे सध्या 1 गुण आहे आणि अजून दोन सामने बाकी आहेत.
24 फेब्रुवारी – इंग्लंडविरुद्ध, पल्लेकल
28 फेब्रुवारी – श्रीलंकेविरुद्ध, पल्लेकल
स्वतःच्या बळावर पात्र ठरण्याचा मार्ग
पाकिस्तानला कोणावरही अवलंबून न राहता सेमीफायनल गाठायचे असेल, तर उर्वरित दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचे एकूण 5 गुण होतील, जे सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी पुरेसे ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक सामना आता पाकिस्तानसाठी ‘करो या मरो’ असा आहे.
फक्त 3 गुणांवर संधी कशी?
जर पाकिस्तानने उरलेल्या दोन सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला, तर त्यांच्याकडे एकूण 3 गुण राहतील. या परिस्थितीत, पाकिस्तानला आशा करावी लागेल की त्यांच्या गटातील एका संघाने त्यांचे सर्व सामने जिंकावेत, तर श्रीलंकेने फक्त एक सामना जिंकला. जर असे झाले तर पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. पण, जर न्यूझीलंडनेही उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला तर त्याचेही तीन गुण होतील, जे नंतर नेट रन रेटने ठरवले जातील. त्यामुळे पाकिस्तानसाठी केवळ विजयच नव्हे, तर मोठ्या फरकाने विजय मिळवणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच, पावसामुळे पहिला सामना रद्द झाल्याने पाकिस्तानची सेमीफायनलकडे वाट अधिकच खडतर झाली आहे. आता त्यांच्या प्रत्येक चेंडूत आणि प्रत्येक धावीत सेमीफायनलचे भवितव्य दडलेले असेल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.