IPL 2026 मध्ये महेंद्र सिंग धोनी राडा करणार? चेन्नई सुपर किंग्जच्या CEO ने दिली महत्त्वाची माहिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टी20 वर्ल्ड कप संपल्यानंतर पुढच्या महिन्यात IPL 2026 चं धुमशान सुरू होणार आहे. त्यामुळे आपापल्या संघांना सपोर्ट करण्यासाठी चाहत्यांची लगबग सुरू झाली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांची नावं आघाडीवर असली तरी, सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चा होतीये चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची. धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरणार का? असा प्रश्न चाहत्यांसह क्रीडा प्रेमींच्या मनात निर्माण झाला आहे. यावर आता चेन्नई सुपर किंग्जचे CEO के. एस. विश्वनाथ यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

IPL सुरू होण्यापूर्वी महेंद्र सिंग धोनीच्या खेळण्यावर मागील काही वर्षांपासून वारंवार चर्चा केली जात आहे. मागच्या वर्षीही अशी चर्चा सोशल मीडियावर जोरादर रंगली आणि अखेर महेंद्र सिंग धोनी मैदानात उतरला. यंदाही महेंद्र सिंग धोनीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यासंदर्भात चेन्नई सुपर किंग्जचे CEO के.एस.विश्वनाथन यांनी संकेत दिला आहे की, महेंद्र सिंग धोनी IPL 2026 मध्ये खेळतान दिसेल. त्यामुळे महेंद्र सिंग धोनीसह CSK च्या चाहत्यांच्या उत्साह शिगेलो पोहचला आहे. अनुभव संपन्न महेंद्र सिंग धोनीच्या संघात असल्यामुळे संघाला अधिकच बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र, याबाबत महेंद्र सिंग धोनीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

महेंद्र सिंग धोनीचा समावेश IPL मध्ये सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून केला जातो. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने पाच वेळा IPL चे विजेतेपद पटकावण्याची किमया साधली. धोनीने IPL मध्ये आतापर्यंत 235 सामन्यांमध्ये कर्णधारपद भुषवलं असून 136 सामन्यांमध्ये संघाने विजयी जल्लोष केला आहे.

Comments are closed.