Women’s Asia Cup – हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने आशिया चषक पटकावला; पुण्याच्या लेकीनं बांगलादेशला रडवलं

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ऐकीकडे T20 World Cup 2026 चा धुरळा सुरू आहे. तर दुसरीकडे हिंदुस्थानच्या महिला संघाने बांगलादेशला नेस्तनाबूत करत Women’s Asia Cup Rising Star 2026 चे विजेतेपद पटकावले आहे. बँकॉकच्या टेर्डथाई क्रिकेट स्टेडियमवर इंडिया ए आणि बांगलादेश ए यांच्यामध्ये रंगलेल्या फायनलच्या लढतीत टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि बांगलादेशला 88 धावांमध्ये घरचा आहेर देत सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला.

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांमध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात 134 धावा केल्या. महाराष्ट्राची लेक तेजल हसबनीसने एकटीने खिंड लढवत संघाचा डाव सावरला. 44 धावांवर टीम इंडियाच्या चार विकेट पडल्या होत्या. अशा परिस्थितीत कर्णधार राधा यादवच्या जोडीने तेजलने गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. तेजलने शेवटच्या चेंडूपर्यंत कडवी झुंज दिली आणि 34 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली. तर राधा यादवने महत्त्वपूर्ण 36 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाने बांगलादेशला जिंकण्यासाठी 135 धावांचे आव्हान दिले होते.

टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ अवघ्या 88 धावांवर ढेपाळला. प्रेमा रावतने दमदार खेळाचे प्रदर्शन करत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर सोनिया आणि तनुजाने 2-2 विकेट घेत बांगलादेशला पराभवाच्या छायेत ढकललं. तसेच सायमा, मिनू आणि राधा यादवने यांनीही प्रत्येकी 1-1 विकेट घेत संघाचा विजय निश्चित केला. बांगलादेशकडून शमिमा सुलतानाने सर्वाधिक 20 धावांचे योगदान दिले. इतर तीन फलंदाज वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

Comments are closed.