भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; संघात 4 मोठे बदल

T20 WC 2026: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर 8 फेरीतील संघाचा पहिला सामना आज (22 फेब्रुवारी) खेळला जात आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात आफ्रिकेने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिकन संघाने संघात 4 बदल केले आहेत. तर दुसरीकडे टीम इंडियाने कोणताही बदल केलेला नाही.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
भारत: अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम (विकेटकीप), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
दरम्यान, स्थानिक खेळाडू अक्षर पटेलला या महत्त्वाच्या सामन्यात संधी मिळालेली नाही. नेदरलँड्सविरुद्ध खेळलेल्या संघावरच व्यवस्थापनाने विश्वास ठेवत सुपर-८मधील पहिल्या सामन्यासाठी तीच संयोजना कायम ठेवली आहे.
दोन्ही संघ अपराजित मालिकेसह सुपर-८मध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे या सामन्यातील विजय उपांत्य फेरीकडे वाटचाल करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. क्रिकेटप्रेमींचे लक्ष आता या उच्चदाबाच्या सामन्याकडे लागले आहे.
Comments are closed.