साहेब टॉपवर, लंका तळाशी! लो-स्कोरिंग सामन्यात इंग्लंडचा चमत्कार, श्रीलंकेच्या लाजिरवाण्या पराभव
श्रीलंका विरुद्ध इंग्लंड सुपर-8 T20 विश्वचषक 2026 : पल्लेकेलेच्या मैदानावर इंग्लंडने यजमान श्रीलंकेला 51 धावांनी धूळ चारत क्रिकेट विश्वाला चकित केले आहे. जोफ्रा आर्चर आणि विल जॅक्स यांच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकन फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. इंग्लंडने दिलेल्या 147 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव अवघ्या 95 धावांत आटोपला. जोफ्रा आर्चरच्या वेगाने आणि विल जॅक्सच्या फिरकीने लंकेच्या फलंदाजीचा कणा मोडला. दासुन शनाकाने एका बाजूने किल्ला लढवला खरा, पण दुसऱ्या टोकाकडून साथ न मिळाल्याने श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह इंग्लंडने गुणतालिकेत थेट अव्वल स्थानी झेप घेतली असून श्रीलंका सध्या तळाशी आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय श्रीलंकेला महागात पडला. संपूर्ण सामन्यात गोलंदाजांचेच वर्चस्व राहिले. दोन्ही डाव मिळून तब्बल 19 विकेट्स पडल्या. सुरुवातीलाच जॅक्स आणि आर्चर यांनी घातक मारा करत श्रीलंकेचे कंबरडे मोडले. अवघ्या 34 धावांत 5 गडी बाद झाल्याने श्रीलंकन संघ सावरू शकला नाही.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या सुपर 8 च्या सलामीला 51 धावांनी शिक्कामोर्तब केले.
ICC वेबसाइट आणि ॲपवर ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 च्या प्रत्येक सामन्यासाठी हायलाइट पहा. https://t.co/9ruf5Vr4v4
— ICC (@ICC) 22 फेब्रुवारी 2026
सुपर-8 मध्ये इंग्लंडचा ‘चमत्कार’
सुपर-8 फेरीत इंग्लंडसाठी हा विजय एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हता. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या श्रीलंकेला परिस्थितीची चांगली जाणीव होती. इंग्लंडने 146 धावांवर समाधान मानल्यामुळे सामना त्यांच्या विरोधात झुकला आहे असे वाटत होते. पण गोलंदाजीत इंग्लंडने अप्रतिम पुनरागमन केले. कर्णधार शनाकाने 24 चेंडूत 30 धावांची जिद्दी खेळी केली, मात्र दुसऱ्या टोकाकडून साथ न मिळाल्याने त्यांची झुंज व्यर्थ ठरली.
गोलंदाजीतील हिरो
जोफ्रा आर्चर आणि विल जॅक्स यांचा सलामीचा स्पेल इतका विध्वंसक होता की श्रीलंकेने फक्त 34 धावांत पाच विकेट गमावल्या. कर्णधार दासुन शनाकने लढत राहिला, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. दुसऱ्या टोकाकडून त्याला साथ मिळाली नाही. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने दोन विकेट घेतल्या, तर विल जॅक्स सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने तीन विकेट घेतल्या. आदिल रशीद आणि लियाम डॉसन यांनीही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जेमी ओव्हरटननेही एक विकेट घेतली.
सुपर-8 मध्ये इंग्लंडची विजयी घौडदौड; श्रीलंका तळाला
इंग्लंडने आपल्या पहिल्याच सामन्यात दमदार विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. इंग्लंडने आपला पहिला सामना जिंकून 2 गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा नेट रनरेट +2.550 इतका जबरदस्त असल्याने त्यांनी गुणतालिकेत पहिले स्थान राखले आहे. श्रीलंकेची अडचण: श्रीलंकेला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांचा नेट रनरेट -2.550 इतका खाली घसरल्याने ते सध्या गुणतालिकेत चौथ्या (शेवटच्या) क्रमांकावर आहेत.
पाकिस्तान-न्यूझीलंड कोणत्या स्थानी?
कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर नियोजित सुपर 8 फेरीतील पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातील सामना अखेर पावसामुळे ‘वॉशआउट’ झाल्याचे घोषित करण्यात आले. परिणामी दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला आहे. ते अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.