IND vs SA: नरेंद्र मोदी स्टेडियमवर ‘रन चेस’ करणं कठीण? आतापर्यंत केवळ ‘इतक्या’ वेळाच मिळाला पाठलाग करताना विजय!

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सामना रंगला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमने (Aiden Markram) नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा अनपेक्षित निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

या स्टेडियमवर संध्याकाळच्या वेळी दुसऱ्या डावात दव (Dew) पडल्यामुळे फलंदाजी करणे सोपे जाते. मात्र, येथील आकडेवारी काही वेगळंच सांगते. आतापर्यंत झालेल्या 12 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांपैकी बहुतांश सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानेच बाजी मारली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी या मैदानात लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नसेल.

अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते, जिथे धावा करणे सोपे असते. मात्र, आतापर्यंत या मैदानावर एकूण 12 सामने खेळले आहेत त्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 8 तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 4 विजय मिळविले आहेत. तर सर्वात मोठा यशस्वी पाठलाग (Run Chase): 176 धावांचा आहे जो, (दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड, टी-20 विश्वचषक 2026 मधीलच आहे.

भारतीय संघाची कामगिरी या मैदानावर आतापर्यंत जबरदस्त राहिली आहे. टीम इंडियाने येथे खेळलेल्या 9 सामन्यांपैकी 7 सामन्यांत विजय मिळवला आहे.
या 7 विजयांपैकी 6 विजय प्रथम फलंदाजी करताना मिळाले आहेत, तर फक्त एक विजय लक्ष्याचा पाठलाग करताना मिळाला आहे. 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 165 धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारताने 17.5 षटकांत 3 गडी गमावून विजय मिळवला होता. या सामन्यात इशान किशनने (Ishaan kishan) 56 धावांची शानदार खेळी केली होती.

Comments are closed.