तुमच्या भावनांची कोणाला पडलीये…; स्मृती मानधानाची ‘ती’ पोस्ट अन् क्रिकेटविश्वात खळबळ; नेमकं क
स्मृती मानधना भावनिक टीप : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना पुन्हा एकदा भावूक झालेली पाहायला मिळाली. मात्र यावेळी कारण वैयक्तिक आयुष्य नाही, तर खेळाविषयीची तिची निष्ठा आणि जिद्द होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका जिंकल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक भावनिक नोट शेअर केली आणि चाहत्यांची मने जिंकली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशी मालिका जिंकत दमदार कामगिरी केली. या यशानंतर स्मृतीने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलेला मेसेज विशेष चर्चेत आला.
स्मृती मानधनाने काय लिहिले?
स्मृतीने आपल्या नोटमध्ये लिहिले की, “खेळ तुमच्या भावनांची कोणाला काही पडलेली नाही, हे एक कडू सत्य आहे. तुम्ही थकलेले असाल, नुकतेच जिंकलात किंवा पराभूत झालात, तुम्ही सर्वोत्तम खेळाडू असाल किंवा नवखे… यापैकी कोणत्याही गोष्टीला फारसा अर्थ नाही. तुम्ही किती आत्मविश्वासात आहात किंवा किती घाबरलेले आहात, किती मेहनत घेतली आहे… यापेक्षा महत्त्वाचं एकच आहे… तुम्ही त्या दिवशी खेळ कसा खेळता.”
तिने पुढे लिहिले, “तुमच्यात त्या दिवशी सर्वोत्तम देण्याचा हेतू असला पाहिजे. जर तुम्ही तुमची पूर्ण ताकद, लक्ष आणि खेळाविषयी आदर दिलात, तर यशाची शक्यता नक्कीच वाढते. आणि मग पुन्हा एकदा तेच करण्याची संधी मिळते, हाच खेळाचा सर्वात सुंदर भाग आहे.”
स्मृती मानधना क्रीडा बद्दल ❤️🇮🇳 pic.twitter.com/pkgt6qnwMo
– जॉन्स. (@CricCrazyJohns) 22 फेब्रुवारी 2026
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत स्मृतीची दमदार कामगिरी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत स्मृती मानधना हिने अप्रतिम फलंदाजी केली. तिने तीन सामन्यांत 64.50 च्या सरासरीने आणि 134.38 च्या स्ट्राइक रेटने एकूण 129 धावा केल्या. मालिकेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरत तिने ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ हा मान पटकावला. स्मृतीचा हा मेसेज फक्त तिच्या वैयक्तिक प्रवासाची झलक नाही, तर प्रत्येक खेळाडू आणि चाहत्यांसाठी प्रेरणादायी धडा आहे. भावना असोत किंवा अडचणी, मैदानावर उत्तर फक्त कामगिरीतूनच द्यायचे.
स्मृती मानधना-पलाशचं लग्न मोडलं…
काही महिन्याआधी स्मृती मानधना हिने आपले लग्न रद्द केल्याचे जाहीर केले आहे. तिचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 दिग्दर्शक पलाश मुच्छलसोबत होणार होते, पण काही कौटुंबिक आरोग्य समस्यांमुळे ते पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर 7 डिसेंबर 2025 रोजी दोघांनीही इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लग्न रद्द (Called Off) झाल्याचे स्पष्ट केले. स्मृतीने चाहत्यांना त्यांच्या गोपनीयतेचा (Privacy) आदर करण्याची विनंती केली असून तिने आता पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.