ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेनंतर आता वेस्ट इंडिजची बारी? झिम्बाब्वे पुन्हा उलटफेर करणार का? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) मध्ये सोमवार, 23 फेब्रुवारी रोजी सुपर-8 फेरीचा एक अत्यंत रोमांचक सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज आणि आत्मविश्वासाने भरलेला झिम्बाब्वेचा संघ आमनेसामने असेल. विशेष म्हणजे, या स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत अजेय राहिले असून त्यांनी ग्रुप स्टेजमध्ये एकही सामना न गमावता सुपर-8 मध्ये धडक मारली आहे.
झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करून मोठे उलटफेर केले आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजने त्यांना हलक्यात घेण्याची चूक अजिबात करू नये. चाहत्यांच्या मनात आता एकच प्रश्न आहे की, झिम्बाब्वेचा संघ वेस्ट इंडिजचा विजयरथ रोखू शकेल का?
झिम्बाब्वे सलामीवीर ब्रायन बेनेट जबरदस्त फॉर्ममध्ये असून 3 सामन्यांत 175 धावा केल्या आहेत. कर्णधार सिकंदर रजा बॅट आणि बॉल दोन्हीने योगदान देत आहे, तर गोलंदाजीमध्ये ब्लेसिंग मुजारबानीने 3 सामन्यांत 9 बळी घेतले आहेत. तर वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप (155 धावा) आणि शिमरॉन हेटमायर (134 धावा) आक्रमक फलंदाजी करत आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीची धुरा जेसन होल्डर आणि शमर जोसेफ यांच्या खांद्यावर असून दोघांनीही प्रत्येकी 7 बळी टिपले आहेत.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी पाहिली तर वेस्ट इंडिजचे पारडे जड दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये एकूण सामने 4 खेळले गेले आहेत त्यामध्ये वेस्ट इंडिजने 3 तर झिम्बाब्वे 1 विजय मिळवला आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
झिम्बाब्वे:
ब्रायन बेनेट, तदिवनाशे मारुमणी (यष्टिरक्षक), रायन बर्ल, सिकंदर रझा (कर्ंधर), डिओन मायर्स, टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, वेलिंग्टन मसाकादझा, ब्रॅड इव्हान्स, ग्रीम क्रेमर, ब्लेसिंग मुझाराबानी.
वेस्ट इंडिज:
ब्रँडन किंग, शाई होप (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, अकेल होसेन, गुडाकेश मोती, शामर जोसेफ.
Comments are closed.