नो-लुक शॉट काय असतो? डेवाल्ड ब्रेविसने वर्ल्ड नंबर-1 वरुण चक्रवर्तीला ठोकला असा षटकार! पाहा व्हिडिओ

भारत आणि दक्षिण आफ्रिका (india vs south africa) यांच्यातील सुपर-8 सामन्यात सध्या डेवाल्ड ब्रेविस (Dewald brevis) चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने वरुण चक्रवर्तीसारख्या (Varun Chakrawarthy) जगातील नंबर-1 गोलंदाजाविरुद्ध असा काही षटकार लगावला की चेंडू थेट 82 मीटर दूर सीमारेषेबाहेर जाऊन पडला. ब्रेविसचा हा ‘नो-लुक शॉट’ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 187 धावा उभारल्या आहेत.
ही घटना दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 9 व्या ओव्हरमधील आहे. वरुण चक्रवर्ती त्याच्या स्पेलची दुसरी ओव्हर टाकायला आला होता. पहिल्या 4 चेंडूंवर 11 धावा आल्या होत्या. पाचव्या चेंडूवर ब्रेविसने समोरच्या दिशेने बॅट फिरवली आणि चेंडू सीमापार जाईल की नाही हे पाहण्याची तसदीही घेतली नाही (नो-लुक शॉट). वरुणच्या या ओव्हरमध्ये एकूण 17 धावा आल्या.
वरुण चक्रवर्ती विरुद्ध देवाल्ड ब्रेविस 👀 कमी नाही#INDvsSA #T20WorldCup pic.twitter.com/iZQJudQhB5
— विशाल यादव (@vmkvy95) 22 फेब्रुवारी 2026
‘नो-लुक शॉट’ हा फलंदाजाचा प्रचंड आत्मविश्वास दर्शवतो. जेव्हा फलंदाज चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन जोरात प्रहार करतो आणि शॉट मारल्यानंतर चेंडू कुठे जातोय हे न बघता आपली मान खालीच ठेवतो, तेव्हा त्याला ‘नो-लुक शॉट’ म्हणतात. डेवाल्ड ब्रेविसनेही तेच केले; चेंडू एखाद्या गोळीच्या वेगाने बॅटला लागून थेट बाउंड्रीच्या बाहेर गेला, पण ब्रेविसने आपली नजर चेंडूवर वळवली नाही कारण त्याला खात्री होती की हा षटकारच आहे.
‘नो-लुक शॉट’साठी क्रिकेट विश्वात अनेक खेळाडू प्रसिद्ध आहेत. आंद्रे फ्लेचर वेस्ट इंडिजचा हा खेळाडू आंतरराष्ट्रीय आणि लीग क्रिकेटमध्ये अनेकदा असा शॉट मारताना दिसतो. तसेच एमएस धोनीचा 2009 मधील न्यूझीलंडविरुद्धचा ‘नो-लुक शॉट’चा व्हिडिओ आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान आणि पाकिस्तानचा सैम अयुब देखील या शॉटसाठी ओळखले जातात.
Comments are closed.