IND vs SA: जसप्रीत बुमराहचा जलवा; लसिथ मलिंगाला मागे टाकलं!

भारतीय संघ यंदाच्या टी-२० विश्वचषकातील सुपर ८ मोहिमेची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने करत आहे, जो अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, संघाने २० षटकांत ७ गडी गमावून १८७ धावा केल्या. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात प्रभावी गोलंदाजी केली. त्याने आपल्या ४ षटकांत फक्त १५ धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेतल्या. या सामन्यात बुमराहने श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला मागे टाकत एक उल्लेखनीय कामगिरी केली.

जसप्रीत बुमराह हा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मॅच विनिंग गोलंदाज मानला जातो, जो स्वतःच्या बळावर संपूर्ण सामन्याचा निकाल बदलण्यास सक्षम आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये त्रिफळाचीत (बोल्ड) करून सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत जसप्रीत बुमराह आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, ज्यामध्ये या यादीत पहिल्या स्थानी अफगाणिस्तानचा कर्णधार आणि उत्कृष्ट लेग स्पिनर रशीद खान आहे. रशीद खानने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये गोलंदाजी करून एकूण ५८ विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहने बोल्ड करून ४४ विकेट्स घेतल्या आहेत. लसिथ मलिंगाबद्दल बोलायचे तर त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये बोल्ड करून एकूण ४३ विकेट्स घेतल्या आहेत.

टी-२० सामन्यांमध्ये बोल्ड करुन सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू

राशिद खान (अफगाणिस्तान) – ५८
जसप्रीत बुमराह (भारत) – ४४
एहसान खान (हाँगकाँग) – ४४
लसिथ मलिंगा (श्रीलंका) – ४३
वानिंदू हसरंगा (श्रीलंका) – ४२

जसप्रीत बुमराहने २०२६ च्या टी-२० विश्वचषक सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी केली, तर इतर गोलंदाज अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. बुमराहने त्याच्या चार षटकांमध्ये फक्त १५ धावा दिल्या, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ उर्वरित १६ षटकांमध्ये एकूण १७२ धावा करण्यात यशस्वी झाला. वरुण चक्रवर्तीपासून हार्दिक पांड्यापर्यंत सर्वांनी चेंडूने पूर्णपणे निराश केले.

Comments are closed.