तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो स्पर्धेत वेस्टर्न रेल्वे संघाला विजेतेपद

पुणे, 22 फेब्रुवारी 2026: – आॅलिंपिक स्पोर्टस असलेल्या वाॅटरपोलोला प्रोत्साहन देण्यासाठी डेक्कन जिमखान्या यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो स्पर्धेत अंतिम फेरीत वेस्टर्न रेल्वे (पश्चिम रेल्वे) संघाने इंडियन नेव्ही(भारतीय नौदल) संघाचा पेनल्टी शूट आऊटमध्ये 19-17 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखान्याच्या टिळक तलावावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत वेस्टर्न रेल्वे(पश्चिम रेल्वे) संघाकडून अक्षयकुमार कुंदे 5, अश्विनीकुमार कुंदे 4, श्रेयस वैद्य 2, सारंग वैद्य 2, आदित्य थेटे 2 यांनी तर, इंडियन नेव्ही(भारतीय नौदल)संघाकडून अंकित प्रसाद 5, आनंद एमएस 4, भागेश कुटे 3, प्रणव म्हात्रे 1, तमल मिस्त्री 1, वैभव कुटे 1 यांनी गोल केले. निर्धारित वेळेत सामना 15-15 असा बरोबरीत सुटला व त्यामुळे पेनल्टी शूट आऊट पद्धतीचा अवलंब करण्यात आला. पेनल्टी शूट आऊट मध्ये अश्विनीकुमार कुंदे, सारंग वैद्य, श्रेयस वैद्य, अक्षयकुमार कुंदे यांनी गोल केले. तर पराभुत संघाकडून वैभव कुटे, प्रणव म्हात्रे यांना गोल मारण्यात अपयश आले.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत रोहित बीएस 4, उदय उत्तेकर 3, अप्पू एनएस 2, अफसल नवस 2, ऋतुराज बीडकर 2, पार्थ आंबुलकर 2 यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे) संघाने साऊथ रेल्वे(दक्षिण रेल्वे) संघाचा 15-14 असा कडवा प्रतिकार करत तिसरा क्रमांक पटकावला. पाचव्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत इंडियन एअरफोर्स(भारतीय वायुसेना) संघाने रायगड संघाचा 14-9 असा पराभव करून पाचवा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या वेस्टर्न रेल्वे(पश्चिम रेल्वे) संघाला करंडक व 50हजार रुपये, तर उपविजेत्या इंडियन नेव्ही((भारतीय नौदल) संघाला करंडक व 30हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण कॅट कंट्रोलचे हेमंत कटककर आणि विश्वेश कटककर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे चीफ ट्रस्टी जय आपटे, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव मिहिर केळकर, वित्तीय विभागाचे सचिव गिरीश इनामदार, स्पर्धा संचालक शौर्य करंदीकर, संकेत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
बाहेर पडा: शेवटची फेरी:
वेस्टर्न रेल्वे(पश्चिम रेल्वे): 19(अक्षयकुमार कुंदे 5, अश्विनीकुमार कुंदे 4, श्रेयस वैद्य 2, सारंग वैद्य 2, आदित्य थेटे 2) वि.वि.इंडियन नेव्ही(भारतीय नौदल): 17(अंकित प्रसाद 5, आनंद एमएस 4, भागेश कुटे 3, प्रणव म्हात्रे 1, तमल मिस्त्री 1, वैभव कुटे 1); सामनावीर – आनंद एमएस; पूर्ण वेळ: 15-15; पेनल्टी शूट आउट: 4-2;
तिसऱ्या क्रमांकासाठी लढत:
सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे): 15(रोहित बीएस 4, उदय उत्तेकर 3, अप्पू एनएस 2, अफसल नवस 2, ऋतुराज बीडकर 2, पार्थ आंबुलकर 2) वि.वि.साऊथ रेल्वे(दक्षिण रेल्वे): 14 (अभिनव एएम 6, अभिलाष आर 2, आदर्श बीएस 2, अंबाडी एनएस 1, आदित्यन एबी 1, आकाश व्हिएस 1, अनूप सीएस 1); सामनावीर – अभिनव एएम;
पाचव्या क्रमांकासाठी लढत:
इंडियन एअरफोर्स(भारतीय वायुसेना): 14 (मोंजीथ एमएम 5, सिबिन व्ही 3, नितेश यूएन 2, कल्पेश 1, प्रवीण 1, श्रीजीथ एसके 1, अखिल बीके 1) वि.वि.रायगड: 9 (दिनांशू कुटे 6, निखिल शिंदे 1, रोहन नाकटे 1, हर्ष दैनगाडे 1); सामनावीर – सिबिन व्ही
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट खेळाडू: आदित्य थिटे(वेस्टर्न रेल्वे);
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक: अनिश बाबू बी(साऊथ रेल्वे).
Comments are closed.