नरेंद्र मोदी स्टेडियमवर हिंदुस्थानचा पुन्हा पराभव; सुपर एटच्या पहिल्याच लढतीत दक्षिण आफ्रिकेचा दणका
गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हिंदुस्थानचा पुन्हा पराभव झाला आहे. या मैदानावर 2023च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. आज टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर एटमधील पहिल्याच सामन्यात हिंदुस्थानी संघाचा विजयरथ दक्षिण आफ्रिकेने रोखला. सलग 12 सामने अपराजित असलेल्या हिंदुस्थानचा दक्षिण आफ्रिकेने 76 धावांनी पराभव करत यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहत सलग पाचव्या विजयाची नोंद केली. या सुपर एट विजयामुळे गट 1 मध्ये सुरू झालेल्या अपराजित संघाच्या महासंग्रामात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आणि उपांत्य फेरीच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकले आहे.
Comments are closed.