ओडिशात रस्ता अपघातात 5 पोलिसांचा मृत्यू
ट्रेलर अन् पोलीस वाहनाची टक्कर
वृत्तसंस्था/ झारसुगुडा
ओडिशाच्या झारसुगुडामध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग 49 वर एक ट्रेलर आणि पोलीस वाहनादरम्यान रविवारी टक्कर झाली असून या दुर्घटनेत 5 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत अन्य 4 जण जखमी झाले आहेत. एका ट्रेलरने पोलिसांच्या एसयुव्हीला टक्कर मारल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. यामुळे वाहनातून प्रवास करणाऱ्या 8 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 5 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती झारसुगुडाचे पोलीस अधीक्षक गुंडाला रे•ाr राघवेंद्र यांनी दिली आहे. जखमींवर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे पोलीस कर्मचारी एका विवाह सोहळ्यातून परतत असताना ही दुर्घटना घडली आहे.
या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि विरोधी पक्षनेते नवीन पटनायक यांनी शोक व्यक्त केला आहे. झारसुगुडा येथे कर्तव्यावर तैनात 5 पोलिसांच्या अकाली निधनाच्या वृत्तामुळे दु:खी आहे. ही हृदयविदायक घटना सर्वांना हादरवून टाकणारी आहे. शोकाच्या या प्रसंगी दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो. राज्य सरकार या दु:खाच्या घडीला प्रभावित परिवारांसोबत उभे असून शक्य ती सर्व मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
Comments are closed.