76 धावांचा घाव अन् स्वप्नांना तडा! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, सेमीफायन

टीम इंडिया सेमीफायनलची परिस्थिती News Marathi : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडियाच्या विजय रथाला अखेर ब्रेक लागला. रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथे झालेल्या सुपर-8 फेरीतील सामन्यात भारताला 76 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या मोठ्या धक्क्यामुळे केवळ पराभवच नाही, तर उपांत्य फेरीची समीकरणेही कठीण झाली आहेत.

सेमीफायनलचा मार्ग कठीण (What is Team India’s semi-final equation?)

या पराभवानंतर भारतासाठी पुढील प्रत्येक सामना ‘करो किंवा मरो’ असा ठरला आहे. 76 धावांच्या मोठ्या फरकाने झालेल्या पराभवाचा नेट रनरेटवर मोठा परिणाम झाला असून भारताचा नेट रनरेट -3.800 वर घसरला आहे. उलट दक्षिण आफ्रिकेचा रनरेट +3.800 इतका भारी झाला आहे. सुपर-8 फेरीत प्रत्येकी चार संघांचे दोन गट करण्यात आले असून ग्रुप-1 मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार असल्याने भारतासाठी पुढील वाटचाल अधिक आव्हानात्मक बनली आहे.

मोठ्या फरकाने विजय अनिवार्य

भारताचे पुढील दोन सामने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध आहेत. हे दोन्ही सामने केवळ जिंकणे पुरेसे ठरणार नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवून नेट रनरेट सुधारावा लागणार आहे. तसेच इतर सामन्यांचे निकालही भारताच्या बाजूने लागणे गरजेचे आहे. संघावर सध्या प्रचंड दबाव असून फलंदाजी क्रम अधिक भक्कम करण्याची गरज आहे. पॉवरप्लेमध्ये आक्रमक सुरुवात, मधल्या षटकांमध्ये स्थिर भागीदारी आणि डेथ ओव्हर्समध्ये अचूक नियोजन या गोष्टी अत्यावश्यक ठरणार आहेत.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 बाद 187 धावा केल्या. प्रत्युत्तर भारताची फलंदाजी पूर्णपणे कोसळली आणि 18.5 षटकांत 111 धावांवर संपूर्ण संघ आटोपला. परिणामी दक्षिण आफ्रिकेने हा सामना 76 धावांनी जिंकत भारताचा उपांत्य फेरीकडे वाटचाल कठीण करून ठेवली.

भारताच्या पराभवाची कारणे कोणती? (What were the reasons for India’s defeat?)

  • या सामन्यात भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची खराब फलंदाजी.
  • लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीची जोडी चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरली, ज्यामुळे दबाव वाढला.
  • पॉवरप्लेमध्ये भारताने तीन विकेट गमावल्या, ज्यामुळे संघाला पुनरागमन करणे कठीण झाले.
  • भारताच्या मधल्या फळीला या स्पर्धेत प्रभावीपणे आपली भूमिका बजावता आली नाही आणि या सामन्यातही तेच दिसून आले.
  • भारताचे एकाच खेळाडूवर अवलंबून राहणे महागात पडले.

हे ही वाचा –

Ind vs Sa Super 8 T20 World Cup 2026 : पराभवानंतर सूर्या खचला! कोणावर फोडलं पराभवाचं खापर?, कॅप्टनने जाहीरपणे नाव घेतलं, म्हणाला…

आणखी वाचा

Comments are closed.