नक्षलवादी कमांडर देवजीने तेलंगणात आश्रय घेतला
न्यूज एजन्सी/ हैदराबाद
नक्षलवादी संघटनेचा सरचिटणीस टिप्पीरी तिरुपती उर्फ देवजी याने तेलंगणा पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. देवजीने त्याचा सहकारी सीसीएम संग्रामसह पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता देवजीसोबत अनेक सशस्त्र कार्यकर्तेही आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे. तथापि, पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी केलेली नाही. नक्षलवादी कमांडर देवजी याला काही महिन्यांपूर्वी संघटनेचा सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यापूर्वी, 19 नोव्हेंबर 2025 रोजी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त बक्षीस असलेल्या नक्षलवादी माडवी हिडमाच्या हत्येनंतर, शीर्ष नक्षलवादी नेता देवजी देखील मारला गेल्याची बातमी समोर आली होती. तथापि, याला अधिकृतपणे दुजोरा देण्यात आला नव्हता.
Comments are closed.