Maharashtra Budget 2026 : विरोधकांचा बहिष्कार, मात्र सत्ताधारी उत्साहात; पाहा चहापानाच्या वेळचे फोटो

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून (23 फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. 25 मार्चपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात 6 मार्च रोजी दुपारी 2 वाजता 2026-27 वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. याचपार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र नेहमीप्रमाणे विरोधकांकडून चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. असे असले तरी विरोधकांच्या बहिष्कारानंतरही सत्ताधारी चहापानाच्या कार्यक्रमात उत्साहात असल्याचे पाहायला मिळाले.





Comments are closed.