रोहित पवारांच्या मागण्यांमध्ये तथ्य, ब्लॅक बॉक्स जळून कसा जाऊ शकतो? जितेंद्र आव्हाडांचा सवाल;
अजित पवार विमान अपघातावर जितेंद्र आव्हाड: अजित पवार (Ajit Pawar Death) 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे जात असताना त्यांचे विमान धावपट्टीवर उतरताना कोसळले. त्यानंतर झालेल्या भीषण स्फोटात अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अलीकडेच घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विमानात गरजेपेक्षा जास्त इंधन असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच वैमानिक सुमित कपूर यांनी विमान जाणीवपूर्वक जमिनीवर आदळले असावे, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. तर अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती समोर आली आहे. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तपास यंत्रणांवर निशाणा साधलाय.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मला आश्चर्य वाटत आहे की, ब्लॅक बॉक्स जळून गेला. ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो, तो विमानाचा भाग जशाच्या तसा होता. ब्लॅक बॉक्स ज्या मटेरियलचं बनवलेलं आहे ते मटेरियल टायटॅनियम आहे. 11,000 सेल्सिअसच्या आगीत देखील त्या बॉक्सला काहीही होऊ शकत नाही. अशी परिस्थिती असताना देखील सरळ सांगितले जाते की, ब्लॅक बॉक्स जळून गेला. त्यामुळे आम्हाला शंका येईलच की, ब्लॅक बॉक्स कसा जळून जाऊ शकतो? त्यामुळे रोहित पवार जी मागणी करत आहेत, त्या मागण्यांमध्ये तथ्य आहे, असे त्यांनी म्हटले.
Jitendra Awhad on Ajit Pawar Plane Crash: तो भाग अपघाताच्या ठिकाणी जसाच्या तसा पडलेला होता
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, जितका चौकशीला उशीर करतील, जेवढ्या खोट्या नाट्या गोष्टी सांगतील, तेवढाच संशयाला वाव मिळणार आहे. ब्लॅक बॉक्स जाळून गेला ही माझी सर्वात मोठी शंका आहे. जगातल्या कुठल्याही अपघातात ब्लॅक बॉक्स जळून गेला, असे कधीही सांगितले गेलेले नाही. शंकेला जर चौकशीच्या माध्यमातून वाव मिळणार असेल तर शंका उपस्थित होणारच आहे. ब्लॅक बॉक्स ज्या ठिकाणी ठेवला जातो, तो भाग अपघाताच्या ठिकाणी जसाच्या तसा पडलेला होता, असे देखील त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.