झिम्बाब्वे फायनलमध्ये, तर टीम इंडिया…; राहुल द्रविड यांचं मोठी भाकीत! क्रिकेटमध्ये होणार उलटफ
T20 विश्वचषक 2026 फायनलसाठी राहुल द्रविडची भविष्यवाणी : राहुल द्रविड यांनी टी-20 वर्ल्ड कप 2026 संदर्भात मोठं विधान केलं आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देणारे माजी मुख्य प्रशिक्षक द्रविड यांना वाटतं की, भारतासोबत अंतिम सामन्यात जर झिम्बाब्वे पोहोचली तर ते क्रिकेटसाठी अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी ठरेल.
द्रविड यांनी स्पष्ट सांगितले की, भारतीय संघाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या गेम प्लॅनवर ठाम राहायला हवे. टी-20 हा अत्यंत अनिश्चिततेचा फॉरमॅट आहे आणि कोणत्याही दिवशी निकाल बदलू शकतो, पण प्रक्रियेवर विश्वास ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. पण सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील 22 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवांनी सुपर-8 फेरीतील मोहिमेची सुरुवात केली.
द्रविड काय म्हणाले?
NDTVला दिलेल्या मुलाखतीत द्रविड म्हणाले, “भारताचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आम्ही फक्त एक-दोन खेळाडूंवर अवलंबून नाही. संघात खोली आहे. त्यामुळे योग्य वेळी वेगवेगळे खेळाडू पुढे येऊ शकतात. टी-20 क्रिकेट हे सर्वात अस्थिर फॉरमॅट आहे. प्रशिक्षक म्हणूनही मी शिकलो की, कोणत्याही दिवशी पराभव होऊ शकतो. त्यामुळे प्रक्रियेवर टिकून राहा, जे शक्य आहे ते करा आणि चांगल्याची अपेक्षा ठेवा.”
ते पुढे म्हणाले, “भारत विरुद्ध कोणतीही टीम मी तयार आहे. जर भारत विरुद्ध झिम्बाब्वे असा अंतिम सामना झाला तर तो झिम्बाब्वे क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण ठरेल. एखादी लहान संघ अंतिम फेरीत पोहोचली तर ते क्रिकेटसाठी अत्यंत चांगलं असेल.”
असोसिएट संघांबद्दल मत
द्रविड यांनी असोसिएट देशांच्या कामगिरीचेही कौतुक केले. “या टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे असोसिएट संघांनी केलेली शानदार कामगिरी. अनेक संघ सुपर-8 मध्ये पोहोचू शकले नाहीत, कारण हा फॉरमॅट कठीण आहे. पण त्यांनी दाखवून दिलं की त्यांच्याकडे दर्जेदार आणि युवा प्रतिभा आहे. जागतिक क्रिकेटसाठी हा सकारात्मक संकेत आहे,” असे द्रविड म्हणाले.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.