टीम इंडियाला उध्वस्त करूनच मानणार गंभीर! प्लॅनिंग चुकले की जिद्दीने गमावला सामना? कोण जबाबदार

भारताने मागील टी२० मालिकांमध्ये जी जबरदस्त कामगिरी केली त्यावरुन घरच्या मैदानावर होणाऱ्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये त्यांचेच वर्चस्व असणार असे वातावरण निर्माण झाले. या स्पर्धेत भारताने एकही सामना न गमावता सुपर-८ची फेरी गाठली. तेथे त्यांना पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. रविवारी (२२ फेब्रुवारी) झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७६ धावांनी पराभव केला. या पराभवाला जबाबदार अनेकांना ठरवले जात आहे, मात्र यामध्ये सर्वात मोठा वाटा भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा आहे.
खेळ काही केवळ मैदानावरच नाही तर डोक्यानेही खेळावा लागतो. भारताच्या संघ व्यवस्थापकांनी येथेच चूक केली आहे. अहमदाबादच्या काळ्या मातीच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची मोठी कमकुवत बाजू पुन्हा एकदा समोर आली. या स्पर्धेत भारताचे डावखुरे फलंदाज ऑफ स्पिनचा अधिक शिकार होताना दिसले. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धही घडले. पुढे आपण भारताने आणखी कुठे आणि काय चूका केल्या तेही जाणून घेऊ.
तसेच या स्पर्धेसाठी भारतासाठी सलामीला कोण येणार हे स्पर्धेआधी निश्चित झाले नव्हते. शुबमन गिलला अचानक विश्वचषकाच्या संघातून बाहेर केले गेले. तसेच श्रेयस अय्यरला संधी दिली नाही. यावरूनही चर्चा झाल्या होत्या. त्यामुळे संघनिवड अधिकाऱ्यांच्या निर्णयाबाबत प्रश्न निर्माण झाले होते. ईशान किशनला संधी दिली हे एक मात्र चांगला निर्णय ठरला.
गंभीरने सर्वोत्तम अकरा खेळाडू खेळवण्याऐवजी नवनवे प्रयोग केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अक्षर पटेलला अंतिम अकरामधून काढत वॉशिंग्टन सुंदरला संघात घेण्याचा निर्णय घेतला. तसेच कुलदीप यादवला पाकिस्तानविरुद्धच्या एकाच सामन्यात खेळवले आणि वरुण चक्रवर्तीला अधिक महत्व देत नंतर कुलदीपला बाकावर बसवले. असे प्रयोग विश्वचषकासाठीच्या स्पर्धांमध्ये करणे किती योग्य, असे प्रश्न भारताच्या अनेक दिग्गजांनीही विचारले.
खराब दूरदृष्टी असणारा यशस्वी रणनीतीकार बनू शकत नाही. भारताने २०११मध्ये विश्वचषक जिंकला तर त्यासाठी २००८पासूनच संघात प्रयोगाची सुरूवात झाली. २०१५च्या विश्वचषकासाठी २०१२ला सुरुवात करावी लागला. यावरून विश्वचषकात खेळण्याआधी खेळाडू संघात निवडले जाणार की नाही हा विचार करत तयारीला लागतात.
या स्पर्धेसाठी भारत पूर्ण तयारीत दिसला नाही, हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतर कळत आहे.
Comments are closed.