परिस्थिती गंभीर, तातडीने इराण सोडा! हिंदुस्थानी दूतावासाचा नागरिकांना इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणमध्ये वाढत्या तणाव आणि अलिकडच्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती खूपच गंभीर आहे. याच पार्श्वभूमीवर तेहरानमधील हिंदुस्थानी दूतावासाने सर्व हिंदुस्थानी नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. X दूतावासाने सल्ला दिला आहे की, विद्यार्थी, यात्रेकरू, व्यापारी आणि पर्यटकांसह सर्व हिंदुस्थानींनी उपलब्ध मार्गांनी इराण सोडावे.

दूतावासाने लिहिले आहे की, “इराणमधील सध्याची परिस्थिती पाहता, हिंदुस्थानी नागरिकांना (विद्यार्थी, यात्रेकरू, व्यापारी आणि पर्यटक) व्यावसायिक उड्डाणांसह सर्व उपलब्ध मार्गांनी इराण सोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. १४ जानेवारीला दिलेल्या सूचनेनुसार, परत एकदा दूतावासाने हिंदुस्थानी नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच निदर्शने किंवा निदर्शने होण्याची ठिकाणे टाळावीत, हिंदुस्थानी दूतावासाच्या संपर्कात राहावेत आणि स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवावे.” दूतावासाने पुढे म्हटले आहे की सर्व हिंदुस्थानींनी त्यांचे पासपोर्ट, ओळखपत्रे आणि इतर प्रवास कागदपत्रे नेहमी तयार ठेवावीत. कोणत्याही मदतीसाठी दूतावासाशी संपर्क साधावा.

हिंदुस्थानी दूतावासाने नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

+९८९१२ ८१०९११५
+९८९१२ ८१०९१०९
+९८९१२ ८१०९१०२
+९८९९३ २१७९३५९

याआधी ५ जानेवारीला परराष्ट्र मंत्रालयाने इराणला जाऊ नका असे सांगितले होते. तसेच १४ जानेवारी ला देखील दूतावासाने सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता. सध्याची फेब्रुवारीमधील परिस्थिती पाहता परिस्थिती बिघडल्यास “ताबडतोब निघून जा” असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.