T20 World Cup – वानखेडेवर हेटमायरचा तुफानी शो; वेस्ट इंडिजकडून झिम्बाब्वेचा 107 धावांनी धुव्वा, टीम इंडियाची डोकेदुखी वाढली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ICC T20 World Cup सुपर 8 मध्ये वेस्ट इंडिजने ने झिम्बाब्वेवर 107 धावांनी दणदणीत विजय मिळवत सेमीफायनलच्या शर्यतीत मोठी आघाडी घेतली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 254 धावांचा डोंगर उभारला. हा टी-20 विश्वचषक इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च संघस्कोर ठरला. आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची घसरगूंडी झाली आणि वेस्ट इंडिजने सामना जिंकला.

वेस्ट इंडिजच्या डावाचा कणा ठरला शिमरॉन हेटमायरने अवघ्या 34 चेंडूत 85 धावांची स्फोटक खेळी करत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्याने केवळ 19 चेंडूत अर्धशतक झळकावत टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिजकडून सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम नोंदवला. कर्णधार rawman powelney 35 चेंडूत 59 धावा आणि रदरफोर्ड 13 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी. दोघांनीही शेवटच्या षटकांत धडाकेबाज फटकेबाजी करत संघाचा स्कोर 250 पार नेला.

वेस्ट इंडिजने दिलेल्या 255 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची फलंदाजी कोलमडली. वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंनी सामन्यावर पूर्ण पकड घेतली. गुडाकेश मोती याने 4 बळी घेत झिम्बाब्वेचा कणा मोडला, तर अकील होसेन याने 3 गडी बाद करत सामना एकतर्फी केला. फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकल्यामुळे झिम्बाब्वेचा डाव 17.4 षटकांत 147 धावांवर आटोपला.

या मोठ्या विजयामुळे सुपर 8 मधील गट 1 मध्ये वेस्ट इंडिजचा नेट रन रेट दक्षिण आफ्रिकेपेक्षाही वर गेला आहे. त्यामुळे सेमीफायनलच्या दृष्टीने समीकरणे रंगतदार झाली असून हिंदुस्थानला आपली आशा जिवंत ठेवण्यासाठी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवणं अनिवार्य ठरणार आहे.

Comments are closed.