ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे निधन
ज्येष्ठ छायाचित्रकार आणि द मुंबई प्रेस क्लबचे उपाध्यक्ष रजनीश काकडे यांचे सोमवारी निधन झाले. ते 55 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बंधू राजेश काकडे आणि बहीण असा परिवार आहे.
रजनीश काकडे हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात येत होते, मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. काकडे यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेले रजनीश काकडे यांनी अनके वर्षे माध्यमांमध्ये काम केले. काकडे यांनी अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण क्षण अत्यंत संवेदनशीलतेने पॅमेऱयात टिपले. त्यांनी नवोदित छायाचित्रकारांना नेहमीच मार्गदर्शन केले. काकडे यांच्या निधनाने माध्यम क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
Comments are closed.