दिल्ली सचिवालय बॉम्बने उडवण्याची धमकी
लाल किल्ला परिसरातही बॉम्बस्फोटाचा इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लाल किल्ला आणि दिल्ली सचिवालयात सोमवारी दुपारी बॉम्बची धमकी मिळाली. याबाबत दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर लाल किल्ला आणि दिल्ली सचिवालय संकुलाच्या आत आणि बाहेर शोधमोहीम सुरू करण्यात आली. खलिस्तानी गटाच्या नावाने धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी, बॉम्ब निकामी करणारे पथक, श्वान पथके आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. धमकीचा संदेश जारी करणाऱ्या ई-मेलचा स्रोत शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या पथकाने सायबर सेलची मदत घेतली जात आहे.
लाल किल्ला आणि दिल्ली सचिवालयावर बॉम्ब टाकण्याच्या धमकीमुळे दुपारच्या सुमारास सर्वच सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरू झाली. पोलीस पथके तात्काळ कारवाईत उतरली. लाल किल्ला संकुल रिकामी करून तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली. आयटीओ जवळील दिल्ली सचिवालयात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून तपासणी सुरू करण्यात आली होती.
Comments are closed.