विश्वविजेता भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर! ‘हे’ 3 खेळाडू ठरले पराभवाचं मुख्य कारण

भारतीय संघ 2026 टी-20 (Icc T20 international world cup 2026) वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. उरलेल्या सामन्यांच्या गणितानुसार, भारताच्या ग्रुपमधून वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये (अंतिम-4) जागा मिळवतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पॉइंट्स टेबलचा विचार केला तर भारताच्या तुलनेत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका खूपच चांगल्या स्थितीत आहेत. पण टीम इंडियाची ही अवस्था होण्यामागे कोण जबाबदार आहे? यामध्ये प्रामुख्याने अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची नावे घेतली जात आहेत.
अभिषेक शर्मा
टीम इंडियाची ही अवस्था होण्यामागे सर्वात मोठी भूमिका अभिषेक शर्माची (Abhishek Sharma) राहिली आहे. जेव्हा संघाला चांगली सुरुवातच मिळत नाही, तेव्हा इतर फलंदाजांमध्ये मोठा स्कोर बनवण्याचा आत्मविश्वास कुठून येणार? या टी-20 वर्ल्ड कपमधील 4 डावांमध्ये त्याने केवळ 15 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये सलग तीन वेळा ‘शून्य’वर बाद होण्याच्या (जीरोची हॅट्ट्रिक) लाजीरवाण्या विक्रमाचाही समावेश आहे. अभिषेकला चांगली सुरुवात करून देता न येणे, हे भारताच्या या स्थितीचे एक मोठे कारण ठरले आहे.
टिळक वर्मा
हा तोच तिलक वर्मा (Tilak Verma) आहे, ज्याने 2025 च्या एशिया कप फायनलमध्ये 69 धावांची झुंजार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता. मात्र, 2026 टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याचा स्ट्राईक रेट केवळ 119 चा आहे. 5 डावांत त्याने फक्त 107 धावा केल्या असून, यात एकही अर्धशतक किंवा शतक नाही. अभिषेक अपयशी ठरत असताना तिलकने जबाबदारी घ्यायला हवी होती, पण तो या भूमिकेत पूर्णपणे अपयशी ठरला आहे. या वर्ल्ड कपमध्ये तिलकची सरासरी अवघी 21.40 ची राहिली आहे.
वॉशिंग्टन सुंदर
दुखापतीतून सावरल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) सुपर-8 चा पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. संघ व्यवस्थापनाने मोठ्या विश्वासाने त्याला सुपर-8 सारख्या महत्त्वाच्या सामन्यात संधी दिली होती, पण त्याला त्याचे सोने करता आले नाही. उपकर्णधार अक्षर पटेल (Axar Patel) बाहेर vaslela असताना सुंदरला 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले होते, पण तो केवळ 11 धावाच करू शकला. तसेच गोलंदाजीमध्येही त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.
Comments are closed.