टी20 वर्ल्ड कप सुरू असतानाच स्टार भारतीय खेळाडू अचानक घरी परतला! धक्कादायक कारण समोर

झिम्बाब्वेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकू सिंग (Rinku Singh) अचानक संघ सोडून आपल्या घरी परतला आहे. रिपोर्टनुसार, घरच्या काही वैयक्तिक कारणामुळे (Family Emergency) रिंकूला तातडीने घरी जावे लागले आहे. याच कारणामुळे त्याने 24 फेब्रुवारीच्या सराव सत्रात (Practice Session) भाग घेतला नाही. रिंकूचे अशा प्रकारे अचानक जाणे भारतासाठी चिंतेची बाब आहे, कारण तो संघात फिनिशरची महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

सुपर-8 फेरीतील भारताचा पुढचा सामना 26 फेब्रुवारीला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झिम्बाब्वेविरुद्ध (India vs Zimbabwe) होणार आहे. मात्र, या सामन्यात रिंकू सिंग खेळणार की नाही, याबाबत आता शंका निर्माण झाली आहे. तो कधी परतणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्ध तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल की नाही, हे सांगणे कठीण आहे. बीसीसीआयने (BCCI) अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या टीम इंडियाच्या सराव सत्रात रिंकू सिंग दिसला नाही. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये संध्याकाळी 5:30 च्या सुमारास संपूर्ण संघाने सराव केला, पण त्यापूर्वीच रिंकू मेडिकल इमर्जन्सीमुळे (वैद्यकीय कारणास्तव) आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, रिंकूच्या वडिलांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही आणि ते कॅन्सरशी (कर्करोग) झुंज देत आहेत. अशा कठीण परिस्थितीत आपल्या वडिलांसोबत काही वेळ घालवण्यासाठी तो घरी गेला आहे.

Comments are closed.