वडिलांची तब्येत बिघडली अन् T20 World कप सोडून रिंकू सिंह घरी परतला; झिम्बाब्वेविरुद्ध खेळणं मुश्कील

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टीम इंडियाचा फिनीशर आणि आक्रमक फलंदाज रिंकू सिंह वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे त्याने तात्काळ घर गाठलं आहे. त्याच्या वडिलांना ग्रेटर नोएडा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

टीम इंडियाचा पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध (26 फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. चेन्नईमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी रिंकू सिंह संघासह चेन्नईला पोहोचला होता. याच दरम्यान वडिलांची तब्येत बिघडल्याची माहिती त्याला मिळाली. त्यामुळे त्याने तात्काळ चेन्नई सोडली. रिंकूचे वडील सध्या व्हेटिंलेटरवर असल्याची माहिती मिळाली असून आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्यासाठी रिंकू सिंह अनुपस्थित असण्याची शक्यता आहे. सध्या हिंदुस्थानी संघ आणि सपोर्ट स्टाफ रिंकू सिंघच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत.

Comments are closed.