22 वर्षांनी उपरती! सचिन तेंडुलकरला आऊट देऊन चूक केली, अंपायर स्टीव्ह बकनर यांची कबुली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानात उतरला की भल्या भल्या गोलंदाजांना घाम फुटायचा. सचिनला बाद करून सामन्यावर वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात विरोधी संघ असायचे. परंतू बऱ्याच वेळा सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद केल्याने वादही निर्माण झाला होता. 22 वर्षांपूर्वी असाच प्रकार वेस्ट इंडिजचे माजी अंपायर स्टीव्ह बकनर यांच्याकडून घडला. त्यांची ही चूक अखेर स्टीव्ह बकनर यांनी मान्य केली आहे.
हिंदुस्थानचा संघ 2003-04 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. ब्रिस्बेन कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाच गिलेस्पीच्या चेंडूवर सचिनला LBW बाद देण्यात आलं. स्टीव्ह बकनर यावेळं अंपायर म्हणून आपली जबाबदारी पार पाडत होते. आणि त्यांनीच सचिनला बाद घोषित केलं. सचिन अवघ्या 3 धावांवर माघारी परतला. परंतू जेव्हा रिप्ले बघण्यात आला त्यात चेंडू स्टम्पच्या वरून जात असल्याच दिसून आलं. त्यामुळे चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी होती. स्टीव्ह बकनर यांच्या या निर्णयावर बरीच टीका सुद्धा झाली. अखेर 22 वर्षांनी वयाच्या 79 व्या वर्षी स्टीव्ह बकनर यांनी आपल्याकडून तेव्हा चूक झाल्याचं मान्य केलं आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट असोसिएशनला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्टीव्ह बकनर यांनी आपली चूक मान्य केली. ते म्हणाले की, “सचिन तेंडुलकरला LBW आऊट देणे ही एक चूक होती. आजही माझ्या त्या निर्णयावर बोललं जातं.” असं स्टीव्ह बकनर म्हणाले आहेत.
Comments are closed.