Pak vs Eng: शाहीन आफ्रिदीचा धमाका, पाकिस्तानला मिळवून दिले दुसरे यश; इंग्लंड 17/2

पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर-८ सामन्यात, पाकिस्तानने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला शाहीन आफ्रिदीने दुसरा धक्का दिला आहे. त्याने जोस बटलरला आपल्या जाळ्यात फसवले. यापूर्वी शाहीनने डावाच्या पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टची विकेट घेतली होती.

​नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने निर्धारित षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावा केल्या आहेत. पाकिस्तानची सुरुवात खराब झाली होती, मात्र सलामीवीर फरहान मध्यक्रमातील फलंदाजांसोबत छोट्या भागीदारी करून संघासाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. फरहानने सर्वाधिक ६५ धावा केल्या. तर इंग्लंडकडून लियाम डॉसनने ३ बळी घेतले.

​तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगणे इंग्लंडविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सुपर-८ सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये शाहीन आफ्रिदीचे पुनरागमन झाले आहे. विशेष म्हणजे, जर इंग्लंडने आजचा सामना जिंकला, तर चालू टी-२० वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलचे तिकीट मिळवणारा तो पहिला संघ ठरेल.

Comments are closed.