PAK vs ENG : सॅम अय्युब पुन्हा फ्लॉप; विकेट पडताच पाकिस्तानी चाहत्याने रागाने उपटले स्वतःचेच केस! पाहा व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानचा सलामीवीर सॅम अय्युब (Sam Ayyub) संपूर्ण टी-20 वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सुपर-8 सामन्यातही त्याची खराब कामगिरी कायम राहिली; तो फक्त 7 धावा करून बाद झाला. जोफ्रा आर्चरच्या (Jofra Archer) एका वेगवान शॉर्ट पिच चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या नादात त्याने जॅकब बेथेलकडे सोपा कॅच दिला. त्याचा हा खराब शॉट पाहून स्टेडियममधील एक पाकिस्तानी चाहता रागाच्या भरात स्वतःचे केस उपटू लागला.

सॅम अय्युब आणि साहिबजादा फरहान (Sahibjada Farhan) यांनी पाकिस्तानच्या डावाची सुरुवात केली, पण जोफ्रा आर्चरच्या वेगासमोर या दोघांनाही धावांसाठी संघर्ष करावा लागला. तिसऱ्या ओव्हरमध्ये आर्चरने टाकलेल्या शॉर्ट बॉलवर अयूबने बॅट फिरवली, पण टाइमिंग चुकल्यामुळे तो बाद झाला. या वर्ल्ड कपमध्ये साहिबजादा फरहान एकामागून एक अर्धशतके ठोकत आहे, पण त्याचा जोडीदार सॅम अय्युब मात्र फ्लॉप ठरत आहे. अय्युबने आतापर्यंत 5 डावांत केवळ 70 धावा केल्या असून त्याची सरासरी फक्त 14 ची आहे. या खराब कामगिरीमुळे त्याला संघात स्थान देण्याच्या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गेले वर्षही सॅम अय्युबसाठी फारसे चांगले नव्हते. 2025 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 581 धावा केल्या होत्या, पण त्याची सरासरी केवळ 20.75 होती. इतकी खराब फलंदाजी असूनही तो संघात टिकून आहे, याचे मुख्य कारण म्हणजे त्याची स्पिन गोलंदाजी. तो पाकिस्तानसाठी गोलंदाजीचा एक चांगला पर्याय ठरत असून या वर्ल्ड कपमध्ये त्याने आतापर्यंत 5 विकेट्स घेतल्या आहेत.

Comments are closed.