इम्रान यांना गुपचूप रुग्णालयात हलविले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या डोळय़ांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांना सोमवारी मध्यरात्री गुपचूप रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारानंतर पुन्हा तुरुंगात नेण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. इम्रान खान हे 2023 पासून तुरुंगात आहेत. त्यांना तुरुंगात त्रास दिला जात असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली होती. इम्रान खान यांना एका डोळय़ाने कमी दिसत असल्याची तक्रार त्यांच्या वकिलांनी केली होती.

Comments are closed.