सीडीआर प्रकरणात रजनी पंडित निर्दोष
२०१८ मधील कॉल डेटा रेकॉर्डस् खरेदी प्रकरणात महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना ठाणे दंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. पंडित यांच्याविरोधातील आरोप सिद्ध करणारे सबळ पुरावे नाहीत. पुराव्यांचा पूर्ण अभाव आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवल्यामुळे पंडित यांना मोठा दिलासा दिला.
२०१८ मध्ये ठाणे गुन्हे शाखेने सीडीआर चोरी व विक्रीशी संबंधित मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा केला होता. त्यावेळी पोलिसांनी १६ जणांना अटक केली होती. त्यात रजनी पंडित यांचा समावेश होता. शेवटी सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया रजनी पंडित यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली आहे
Comments are closed.