परळच्या शापूरजी पालनजी वसाहतीतील रहिवाशांचे घराचे स्वप्न साकार होणार, पुनर्विकास प्रस्तावाला लवकरच अंतिम मंजुरी
परळ येथील (समर्थ गृहनिर्माण संस्था) शापूरजी पालनजी वसाहतीतील रहिवाशांचे नव्या घराचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. या वसाहतीचा पुनर्विकास प्रस्ताव लवकरच मार्गी लागणार आहे. त्यासाठी शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत व आमदार अजय चौधरी यांनी आज अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजयपुमार मोहंती यांची भेट घेतली. या भेटीत शापूरजी पालनजी वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळाने पुनर्विकासाच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी केली. त्यावर, केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार या वसाहतीच्या पुनर्विकास प्रस्तावाला लवकरात लवकर अंतिम मंजुरी देण्याचे आश्वासन मोहंती यांनी दिले. या बैठकीला गृहनिर्माण संस्थेचे प्रकाश सौंदाळकर, संदीप सावंत, रमेश रजपूत उपस्थित होते.
परळचा शापूरजी पालोनजी कॉलनी पुनर्विकास प्रकल्प अंतिम मंजुरीच्या जवळ आहे
शिवसेनेच्या नेत्यांनी पुनर्विकासाच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी जोर लावल्याने परळमधील शापूरजी पालोनजी वसाहतीतील रहिवाशांना नवीन घरे मिळणार आहेत.
Comments are closed.