मी तुषार दामगुडेला एक बुक्की दिली असती तर पुन्हा उठला नसता; हनुमंत पवारांचा पलटवार
हनुमंत पवार विरुद्ध तुषार दामगुडे: मी शेतीचं काम केलेला, गुरं राखलेला माणूस आहे. मी तुषार दामगुडे याला त्यादिवशी एक बुक्की दिली असती तर तो पुन्हा उठू शकला नसता, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार (Hanumant Pawar) यांनी केले. मी शेतीमधला माणूस आहे, हे मराठवाड्यातील लोकांना माहिती असेल. मी गाई-गुरे राखलेला माणूस आहे. आम्ही बैलाला कोपराने बुक्की देऊन खाली बसवायचो. मी दामगुडेला (Tushar Damgude) एक बुक्की दिली असती तर तो पुन्हा उठू शकला नसता, असे हनुमंत पवार यांनी म्हटले. ते मंगळवारी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
यावेळी हनुमंत पवार यांनी मी काँग्रेसचा कार्यकता असल्याने हिंसा केली नाही, असा दावा केला. तुम्ही माझे कौतुक केले पाहिजे. मी तुषार दामुगडे याच्यावर प्रतिहल्ला केला नाही. मी तुषार दामगुडेच्या हिंसेचा प्रतिकार केला. मी गांधीजींचा आणि काँग्रेस पक्षाचा अनुयायी आहे. त्यामुळे मी तुषार दामगुडे याच्यावर हात उचलला नाही. मी हिंसा केली नाही, हिंसेचा प्रतिकार केला. तुम्ही सीसीटीव्ही बघा, असे हनुमंत पवार यांनी म्हटले.
काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर सोमवारी पुण्यात एका वृत्तवाहिनीच्या डिबेट शो नंतर हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केला होता. यावेळी पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप हनुमंत पवार यांनी दामगुडे यांच्यावर केला होता. पोलिसांनी याप्रकरणी तुषार दामगुडे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता. तसेच तुषार दामगुडे याच्याकडील पिस्तुल आणि परवानाही पोलिसांकडून जप्त करण्यात आला होता. मात्र, त्यांना घरी सोडून देण्यात आले होते.
Tushar Damgude: काल जे काही केलं त्याच्याबद्दल मला अभिमान आहे, जे केलं ते योग्यच होतं: तुषार दामगुडे
तुषार दामगुडे यांनी हनुमंत पवार यांना केलेल्या मारहाणीबाबत कोणताही पश्चाताप किंवा खंत नसल्याचे म्हटले होते. मी जे केले ते योग्यच केले, असे मला वाटते. या प्रकारच्या लोकांना कधी कधी ठाम आणि स्पष्ट शब्दांतच उत्तर द्यावे लागते. त्या ठिकाणी जे काही घडले, त्याबद्दल मला कोणतीही खंत नाही. हनुमंत पवार ज्या विचारसरणीतून येतात, त्या पार्श्वभूमीवर त्यांना ठोस प्रत्युत्तर देणे गरजेचे होते. काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात देशात अनेक गंभीर घटना घडल्या आहेत, याचीही नोंद घ्यायला हवी. डिबेटदरम्यान हनुमंत पवार यांनी मला उद्देशून “तू पेशव्यांची पैदास आहेस, तू नाना फडणीस यांची पैदास आहेस; मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे. माझ्याकडे कायदेशीर परवान्यासह बंदूक आहे. मी अनेक नक्षलवादी भागांमध्ये काम करतो, आणि त्या अनुषंगाने स्वतःच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने बाळगणे मला गरजेचे वाटते. पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस योग्य ते तपास करतील. पोलिसांनी मला माझं शस्त्र मागितलं मी ते त्यांना सोपवलं आहे, असे तुषार दामगुडे यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.