अजितदादांच्या अपघाताचा छडा लावण्यासाठी रोहित पवार-अमोल मिटकरी एकत्र, DGCA वर गुन्हा दाखल करणार
अजित पवार विमान अपघात: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे डीजीसीएच्या विरोधात मरीन ड्रॉइव्ह पोलीस स्थानकात गुन्हा नोंद दाखल करण्याच्या तयारीत्यामुळे असल्याची माहिती समोर आली आहे. विमान अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीवर तत्काळ कारवाई करण अपेक्षित असताना कारवाईला उशीर केल्याने आणि कंपनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना कारवाई न केल्याने गुन्हा नोंद दाखल करण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे.
Rohit Pawar Amol Mitkari : डीजीसीएविरोधात मरीन ड्रॉइव्ह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात विविध शंका उपस्थित केल्या जात आहे. हा अपघात आहे की घात आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी सत्यत्याने या प्रकाणावर भाष्य करत डीजीसीए आणि VSR कंपनीवर गंभीर दोष केले आहेत. तर दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी हे देखील रोहित पवारांच्या भूमिकेशी सहमत असून त्यांनीहे या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर अजितदादांच्या अपघाताचा छडा लावण्यासाठी आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी एकत्र डीजीसीएविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे समोर आलं आहे.
Rohit Pawar : दबाव वाढल्यानंतर आता चौकशी होऊ लागलीहे, पुन्हा पत्रकार परिषद घेणार
दरम्यान28 जानेवारीला जी दुर्दैवी घटना घडली ज्यात महाराष्ट्राचे मोठे नेते अपघातात गेले. त्या दिवसानंतर आत्तापर्यंत सामान्य लोकांना असं वाटत आहे की दादा आज ना उद्या परत येतील. परंतु आम्हाला माहिती आहे की ते परत येणार नाहीत. आमची भूमिका आहे अजित पवारांना न्याय मिळाला पाहिजे अशी आहे. कुणी सोशल मीडियावर बोलत आहे, तर कुणी टपरीवर बोलत आहे, अजित पवारांना न्याय मिळाला पाहिजे. काहींजण सोशल मीडियावर बोलत आहेत. आमदार अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे यासह सर्वजण लढत आहेत. हा लढत असताना प्रेशर निर्माण झालं आहे. ताकद निर्माण झाली आहे, त्यातून लक्षात आलं आहे की, तपासावर आम्ही संशय उत्पन केल्यावर आणि तपासासाठी दबाव वाढल्यानंतर आता चौकशी होऊ लागली आहे. ज्या दिशेने तपास जायला पाहिजे तिकडे जाऊ लागलाय. पण दोन दिवसांनी आणखी एक पत्रकार परिषद घेणार आहे. अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिलीय.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.