‘यादव जी की लव्ह स्टोरी’च्या मेकर्सना अखेर दिलासा, न्यायालयाने म्हणले घूसखोर पंडित पेक्षा हे प्रकरण वेगळे आहे – Tezzbuzz

यादव जी की लव्ह स्टोरी, हा चित्रपट आता प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. हि चर्चा म्हणजे  त्याच्या शीर्षकाला आव्हान देणारी याचिका, मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांना दिलासा देत, सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या शीर्षकाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा खटला “घूसखोर पंडित” या चित्रपटाच्या नाव, प्रकरणापासून पूर्णपणे वेगळा असल्याचे घोषित केला.

“यादव जी की लव्ह स्टोरी” या चित्रपटाच्या शीर्षकावर बंदी घालण्याची किंवा बदल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की चित्रपटाचे शीर्षक कोणत्याही प्रकारे यादव (Yadav)समुदायाची प्रतिमा मलिन करत नाही. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने याचिकेला निराधार ठरवत म्हटले की केवळ भीतीच्या आधारे चित्रपटाचे शीर्षक असंवैधानिक घोषित करता येणार नाही.

न्यायालयाने या प्रकरणाची तुलना मागील ” घूसखोर पंडित” वादाशी केली आणि दोघांमधील फरक स्पष्ट केला. खंडपीठाने असा युक्तिवाद केला की “घूसखोर पंडित” या शब्दाचा अर्थ भ्रष्ट आहे, जो एखाद्या समुदायाशी जोडला गेल्यावर नकारात्मक अर्थ निर्माण करतो. याउलट, “यादव जी की लव्ह स्टोरी” मध्ये यादव समुदायाबद्दल समाजाला नकारात्मक संदेश देणारे कोणतेही शब्द नाहीत.

सर्व कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर, हा चित्रपट आता त्याच्या नियोजित प्रदर्शन तारखेला, 27 फेब्रुवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. न्यायालयाच्या या निर्णयाकडे चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी आणि चाहत्यांसाठी एक मोठा विजय म्हणून पाहिले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्यामधील कोण जास्त शिक्षित आहे? घ्या जाणून

Comments are closed.