व्हीआयपी व्हिजीटर आल्यावर हवेची गुणवत्ता सुधारू शकते, सामान्य मुंबईकरांसाठी का नाही? आदित्य ठाकरे यांचा सवाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई शहरात प्रदूषण सातत्याने वाढत असून हवेची गुणवत्तादेखील ढासळत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला फटकारले आहे. व्हीआयपी व्हिजीटर शहरात आल्यावर रस्त्यांची रंगरंगोटी होते, वाहतूक समस्या सुटतात, हवेची गुणवत्ता सुधारते, तर या सुविधा सामान्य मुंबईकरांसाठी का करण्यात येत नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

शहरातील प्रदूषण वाढत आहे म्हणून सध्या अनेकजण मास्क लावून फिरत आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी मास्क लावणे, हा पर्याय ठरू शकत नाही. आता मास्क लावून काहीही उपयोग नाही. परदेशी पाहुणे किंवा व्हीआयपी व्हिजीटर येतात, ते या वाढत्या प्रूषणामुळे मास्क लावून येताना दिसले तर राज्य सरकार, मुंबई महापालिका या बांधकामांवर आणि सुरू असलेल्या कंस्ट्रक्शनवर बंदी आणते आणि त्यावेळी प्रदूषण कमी होते. तसेच एक्यूआयदेखील सुधारतो, असे ते म्हणाले.

व्हीआयपी व्हिजीट होत असताना वाहतूक कोडींची समस्या सुटू शकते, रस्त्यांची रंगरंगोटी होऊ शकते, प्रदूषण नियंत्रणात राहू शकते. बांधकामांवर ते नियंत्रण ठेवू शकतात तर सामान्य नागारिकांसाठी किंवा मुंबईकरांसाठी का होऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी केला. हाच प्रश्न आपण उपस्थित केला आहे. मुंबई आयुक्तांनाही आपण या समस्यांबाबत सांगितले. शहरात व्हीआयपी व्हिजीटर येत आहेत, असे समजून सामान्य लोकांसाठी हवेची गुणवत्ता सुधारावी. शहरात जी खासगी किंवा इतर बांधकामे सुरू आहेत, त्यावर आठवड्याभरासाठी बंदी घालावी, हवेची गुणवत्ता सुधारु द्यावी. हवेची गुणवत्ता सुधारल्यानंतर बांधकामांना ठराविक नियम आणि वेळेची मर्यादा घालून द्यावी, कोणत्या वॉर्डमध्ये कधी बांधकाम करावे, याबाबत नियम झाले तर सामान्य मुंबईकरांना मास्क लावून फिरण्याची गरज भारणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Comments are closed.