डेव्हिड मिलर आणि रोव्हमन पॉवेल तिलक वर्मापेक्षा कमकुवत? आयसीसी स्पर्धेत ‘या’ कारणामुळे मोठा वाद

आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 (icc T20 international world cup 2026) मध्ये टीम इंडियाचा स्टार खेळाडू तिलक वर्माची (Tilak Verma) कामगिरी निराशाजनक झाली आहे, ज्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, ब्रॉडकास्टरने (प्रक्षेपक) अशी एक आकृती दाखवली, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ब्रॉडकास्टरने ताकदीच्या (Power) बाबतीत डेव्हिड मिलर आणि रोव्हमन पॉवेल यांच्यापेक्षाही तिलक वर्माला सरस दाखवले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर चाहते संतापले असून ब्रॉडकास्टरला ट्रोल करत आहेत.

टी-20 विश्वचषकादरम्यान ब्रॉडकास्टरने ‘स्किल मीटर’ नावाची एक तुलना सुरू केली. यामध्ये डेव्हिड मिलरला पॉवर हिटिंगमध्ये 64 पॉइंट्स दिले, तर तिलक वर्माला 97 गुण दिले. वास्तविक, मिलर हा क्रिकेट विश्वात एक मोठा हिटर आणि मॅच फिनिशर म्हणून ओळखला जातो, तर तिलक आपले बहुतेक शॉट्स ‘टाइमिंग’वर खेळताना दिसतो. इतकेच नाही तर वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार रोव्हमन पॉवेलला देखील पॉवर हिटिंगमध्ये 94 पॉइंट्स देऊन तिलकच्या मागे ठेवले आहे. हे मानायला चाहते अजिबात तयार नाहीत. ब्रॉडकास्टर दाखवत असलेले हे ‘स्किल मीटर’ पूर्णपणे चुकीचे असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

टीम इंडिया सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताला मोठ्या विजयाची गरज आहे, अशा वेळी तिलक वर्माला आपली कामगिरी सुधारावी लागेल. जर टॉप ऑर्डरने धावा केल्या नाहीत, तर झिम्बाब्वे संघ मोठी अडचण निर्माण करू शकतो. या स्पर्धेत आतापर्यंत तिलक वर्माने 5 सामने खेळले असून, 21.40 च्या सरासरीने केवळ 107 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेट अवघा 118 राहिला आहे, ज्यामुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढत आहे.

Comments are closed.