Manoj Jarange : मराठा समाजामुळेच सरकार सत्तेवर! सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange : मराठा समाजामुळेच सरकार सत्तेवर! सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा इशारा

कुणबी प्रमाणपत्रसाठी आलेल्या प्रत्येक अर्जदाराला प्रमाणपत्र द्या, याच अधिवेशनात सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिला. मराठा समाजामुळेच हे सरकार सत्तेवर आले आहे. सरकारने न्याय नाही दिला तर 2029 मध्ये हाच समाज भाजपाला पायउतार करेल असा इशारा जरांगे पाटलांनी परभणीत दिला. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी बाधित शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत आज याच शेतकऱ्यांची मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली आणि आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. आपलं म्हणणं सरकार दरबारी मांडलं पाहिजे असेही मनोज जरांगे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली आणि शेतकऱ्यांची महसूलमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना जर शक्तिपीठ महामार्गाला जमिनी द्यायच्या नसतील तर सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments are closed.