सलग तीनदा शून्यावर बाद झाल्यावर अभिषेक शर्माचं रँकिंग घसरलं का? पाहा आयसीसीची ताजी अपडेट

भारतीय फलंदाज अभिषेक शर्मासाठी (Abhishek Sharma) 2026 चा टी-20 विश्वचषक आतापर्यंत खराब ठरला आहे. (icc T20 international world cup 2026) सुरुवातीच्या चार सामन्यांत अभिषेकने केवळ 15 धावा केल्या आहेत. या सर्व धावा त्याने चौथ्या सामन्यात केल्या, कारण पहिल्या तीन सामन्यांत तो खातेही न उघडता (शून्यावर) बाद झाला होता. तीन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर अभिषेकच्या टी-20 रँकिंगमध्ये बदल झाला आहे.

तर, टी-20 विश्वचषकात सलग तीन वेळा ‘डक’ (शून्य) मिळवूनही अभिषेकच्या रँकिंगवर कोणताही परिणाम झालेला नाही. विश्वचषकापूर्वी तो नंबर वन होता आणि खराब फॉर्मनंतरही तो पहिल्याच स्थानावर कायम आहे. अभिषेकचे रेटिंग 877 आहे. तर
दुसरीकडे, टी-20 स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये असलेल्या ईशान किशनला (ishaan kishan) रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. तो तीन स्थानांची झेप घेत टॉप-5 मध्ये सामील झाला आहे. यापूर्वी ईशान 8 व्या क्रमांकावर होता, आता तो 5 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. ईशानचे रेटिंग 742 आहे.

टॉप-5 रँकिंगमध्ये अभिषेकनंतर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा फिल साल्ट (815 रेटिंग) आहे. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा साहिबजादा फरहान (810 रेटिंग) आहे. त्यानंतर श्रीलंकेचा पथुम निसांका 789 रेटिंगसह चौथ्या आणि ईशान किशन पाचव्या क्रमांकावर आहे.

ईशान किशनने आतापर्यंत 5 सामन्यांच्या 5 डावांत 35.20 च्या सरासरीने आणि 193.41 च्या स्ट्राईक रेटने 176 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 अर्धशतके झळकावली असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 77 आहे. ईशानने ही धावसंख्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केली होती. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात ईशान शून्यावर बाद झाला होता. आता टीम इंडियाचा पुढचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध आहे, ज्यामध्ये सर्वांच्या नजरा ईशानवर असतील.

Comments are closed.