बीसीसीआयने या खेळाडूवर ठोठावला मोठा दंड; फायनल मॅचमध्ये केलेली ‘ती’ कृती पडली महागात

रणजी ट्रॉफी २०२५-२६ चा अंतिम सामना केएससीए हुबळी क्रिकेट मैदानावर जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक यांच्यात खेळला जात आहे. दोन दिवसांचा खेळ संपल्यानंतर जम्मू-काश्मीरचा संघ या सामन्यात खूप पुढे असल्याचे दिसून येत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जम्मू-काश्मीरचा कर्णधार पारस डोगरा याने एक लज्जास्पद कृत्य केले, ज्यामुळे आता बीसीसीआयने (BCCI) त्याच्यावर मोठा दंड ठोठावला आहे.
अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी जम्मू-काश्मीरचा कर्णधार पारस डोगरा दुखापतीमुळे ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन मैदाबाहेर गेला होता. दुसऱ्या दिवशी तंदुरुस्त झाल्यानंतर तो पुन्हा मैदानात उतरला. फलंदाजी करत असताना त्याची कर्नाटकचा खेळाडू अविनाश के.व्ही. सोबत बाचाबाची झाली. त्यानंतर त्याने स्वतःचे हेल्मेट अविनाशच्या हेल्मेटवर आदळले. या प्रकारामुळे वाद खूपच वाढला आणि पंचांना मध्यस्थी करण्यासाठी यावे लागले. मयंक अग्रवाल या घटनेमुळे प्रचंड नाराज झाला. सामना संपल्यानंतर बीसीसीआयने पारस डोगरा विरुद्ध कारवाई करत त्याच्या मॅच फीमधील ५० टक्के रक्कम दंड म्हणून कापली आहे. जर त्याने पुन्हा अशी चूक केली, तर त्याच्यावर बंदी (बॅन) देखील घातली जाऊ शकते.
शुभम पुंडीरच्या १२१ धावांच्या खेळीमुळे काश्मीरला सामन्यात बळकटी मिळाली. कर्णधार पारस डोगरा ७० धावा करून बाद झाला. अब्दुल समद देखील ६१ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. कन्हैया वधावनने दुसऱ्या दिवशी ७० धावांचे योगदान दिले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत जम्मू-काश्मीर संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात ५२७ धावा केल्या आहेत. साहिल लोटरा ५७ धावांवर, तर आबिद मुश्ताक २० धावांवर खेळत आहेत. कर्नाटककडून कृष्णाने ३ बळी घेतले. सध्या या सामन्यात कर्नाटकचा संघ खूपच पिछाडीवर पडला आहे.
Comments are closed.