ऑपरेशन सिंदूर थांबवले नसते तर साडेतीन कोटी लोक मेले असते
टॅरिफच्या मुद्दय़ावरून स्वतःच्याच देशात टीकेच्या रडारवर असलेले अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदीचे दावे सुरूच आहेत. ‘हिंदुस्थान-पाकिस्तानचे युद्ध मीच थांबवले. मी हस्तक्षेप केला नसता तर साडेतीन कोटी जीव गेले असते. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफही मारले गेले असते,’ असा दावा ट्रम्प यांनी आज पुन्हा केला. देशाला उद्देशून केलेल्या भाषणात ते बोलत होते. ‘माझ्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या दहा महिन्यांत मी जगातील आठ युद्धे थांबवली. हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर या दोन देशांमध्ये अणुयुद्ध भडकण्याची शक्यता होती. मी मध्यस्थी केल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी स्वतः तशी कबुली दिली होती. माझे आभारही मानले होते, असेही ट्रम्प यांनी सांगितले.
Comments are closed.