खाण अधिकाऱ्याच्या घरातून 4 कोटी जप्त
ओडिशात दक्षता विभागाची कारवाई
वृत्तसंस्था/ कटक
ओडिशात दक्षता विभागाने खाण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे. कटक विभागाच्या डेप्युटी डायरेक्टर ऑफ माइन्स पदावर तैनात देवव्रत मोहंती याला 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले आहे. एका परवानाधारक कोळसा व्यावसायिकाचा कोळसा डेपो सुरळीतपणे चालू देणे आणि कोळशाच्या वाहतुकीची अनुमती देण्याकरता मोहंतीने लाच मागितली होती.
दक्षता विभागाने त्यानंतर मोहंती याच्या फ्लॅटची झडती घेतली असता 4 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम आढळून आली आहे. भुवनेश्वर येथे दो मजली इमारतीचे दस्तऐवज तसेच 130 ग्रॅमचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मोहंतीच्या अन्य ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले असून तेथेही मालमत्तांचे दस्तऐवज अन् रोख रक्कम सापडली आहे. या प्रकरणी मोहंती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Comments are closed.