रणजी ट्रॉफी फायनल: 70 धावा केल्यानंतर मॅच फी कापली, जम्मू-काश्मीरच्या कर्णधारावर मोठी कारवाई

रणजी ट्रॉफी २०२५-२६चा अंतिम सामना कर्नाटक विरुद्ध जम्मू-काश्मीर यांच्यात खेळला जात आहे. पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणाऱ्या जम्मू-काश्मीरने कर्नाटकसमोर आपले उत्तम कामगिरी सादर केली आहे. हा सामना २४ फेब्रुवारीपासून सूरु असून आठ वेळेच्या विजेत्या कर्नाटकला जम्मू-काश्मीर चांगलेच आव्हान देत आहे. या सामन्यात जम्मू-काश्मीर पहिल्या डावात फलंदाजी करत असून त्यांचा कर्णधार पारस डोग्रासोबत एक विचित्र घटना घडली. ज्यामुळे त्याने ७० धावा केल्यावर त्याची सामन्याच्या फिमध्ये कपात करण्यात आली. नेमके काय झाले ते जाणून घेऊ.
पारसच्या फिमध्ये जी कपात करण्यात आली त्यामध्ये त्याने खेळलेल्या डावाचा काही संबंध नाही. त्याचा संबंध कर्नाटकच्या खेळाडूच्या डोक्यात मारण्याशी निगडीत आहे. त्या घटनेनंतर पारसने माध्यमांना सांगितले की परिस्थिती खूपच तापली होती आणि माझ्याकडून काही नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळेच त्याच्या फिमध्ये ५० टक्के कपात करण्यात आली.
झाले असे की सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ फेब्रुवारीला ही घटना घडली. त्यामध्ये पारसने कर्नाटकचा खेळाडू केव्ही अनीशच्या डोक्याला डोके धडकवले. ही संपूर्ण घटना सामन्याच्या १०१व्या षटकात घडली. प्रसिद्ध कृष्णाच्या त्या षटकात पारसने मारलेला शॉट सीमारेषेवर गेला आणि त्यातून त्याने ४ धावा वसूल केल्या. तेव्हा सर्वांचेच लक्ष चेंडूवर होते आणि अनीश स्लेजिंग करत होता. यामुळे रागात येऊन पारस त्याच्याकडे गेला आणि वाद घालताना डोक्याला डोके धडकवले. तेव्हा दोन्ही खेळाडूंनी हेल्मेट घातले होते.
त्यानंतर दोघांमध्ये पंच आणि कर्नाटकचा मंयक अग्रवाल यांनी मध्यस्ती केली. तसे पारसने अनीशची माफी मागितली, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. नंतर अग्रवाल आणि केएल राहुल यांनीही पारसला स्लेज करणे सुरूच ठेवले.
या सामन्यात जम्मू-काश्मीरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचा पहिला डाव दुसऱ्या दिवसाखेर ६ बाद ५२७ असा झाला आहे. त्यामध्ये शुभम पुंडीरने शतकी खेळी केली. त्याने १२१ धावा करत तो जम्मू-काश्मीरकडून या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तसेच पारस ७० धावा करत बाद झाला
Comments are closed.