अंजदीप युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात सामील होणार

पाणबुडीविरोधी युद्धात महत्त्वाची भूमिका : 27 फेब्रुवारीला चेन्नईत सोहळा

वृत्तसंस्था/ चेन्नई

आयएनएस अंजदीप ही युद्धनौका 27 फेब्रुवारी रोजी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. अंजदीप युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाल्याने भारताच्या पाणबुडीविरोधी (एंटी-सबमरीन वॉरफेयर-एएसडब्ल्यू) क्षमतेला आणखी मजबुती मिळणार आहे. एएसडब्ल्यू शॅलो वॉटरक्राफ्ट प्रकल्पाच्या अंतर्गत निर्माण होणाऱ्या 8 युद्धनौकांपैकी ही तिसरी युद्धनौका आहे. नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी हे शुक्रवारी चेन्नईतील तळावर होणाऱ्या कमिशनिंग सोहळ्यात भाग घेणार आहेत.

कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्सकडून निर्मित अंजदीप एक अत्याधुनिक युद्धनौका असून तिला विशेष स्वरुपात देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण किनारी आणि उथळ जलक्षेत्रांमधील किनारी युद्धवातावरणाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.

आयएनएस अंजदीपची वैशिष्ट्यो

-77 मीटर लांब या युद्धनौकेत एक हायस्पीड वॉटर-जेट प्रोपल्शन सिस्टीम असून ती याला त्वरित प्रतिक्रिया आणि निरंतर संचालनाची क्षमता प्रदान करते.

-युद्धनौका ‘डॉल्फिन हंटर’च्या रुपात कार्य करण्यासाठी डिझाइन करण्यात आली असून याचा मुख्य उद्देश किनारी क्षेत्रांमध्ये शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेत त्यांना निष्क्रिय करणे आहे.

-युद्धनौका स्वदेशी, अत्याधुनिक पाणबुडीविरोधी शस्त्रास्त्रs आणि सेंसर पॅकेजने सुसज्ज असून यात अभय सोनारही सामील आहे. हे टॉरपीडो अणि पाणबुडीविरोधी रॉकेट्सनी युक्त आहे.

किनारी क्षेत्राला मिळणार मजबुती

अंजदीप युद्धनौका नौदलात सामील झाल्यामुळे भारताचे विशाल सागरी हित आणि किनारी क्षेत्राचे रक्षण करण्याच्या नौदलाच्या क्षमतेला बळ मिळणार आहे. युद्धनौका पाणबुडीविरोधी युद्धाच्या भूमिकेसोबत किनारी देखरेख, कमी तीव्रतेचे सागरी अभियान आणि शोध तसेच बचाव अभियानांमध्ये सामील होणार आहे.

Comments are closed.