देशविदेश – उद्या, परवा उत्तर भारतात पावसाचा अंदाज

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उत्तर द्या भारतातील डोंगराळ भागात शुक्रवार आणि शनिवार म्हणजेच 27 आणि 28 फेब्रुवारीला पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तराखंडच्या उंच डोंगराळ भागात गेल्या तीन दिवसांपासून बर्फवृष्टी सुरू आहे. पिथौरागड जिह्यातील पंचाचुली क्षेत्रासह अनेक ठिकाणी हलक्या पद्धतीची बर्फवृष्टी झाली आहे. केरळ, कर्नाटक आणि तामीळनाडूमध्ये वेगवान वाऱयासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंदमान – निकोबारमध्ये मध्यम पाऊस पडू शकतो.

अमेरिकेत हिंदुस्थानी व्यक्तीची अपहरणानंतर खून

अमेरिकेत 57 वर्षीय शीख व्यक्तीची अपहरण केल्यानंतर हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. अवतार सिंह असे या व्यक्तीचे नाव असून 17 फेब्रुवारीला रात्री 9 वाजता कॅलिफोर्नियातील ट्रेसी शहरातून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका पांढऱया एसयूव्हीमध्ये त्यांना तीन अज्ञात लोक घेऊन जाताना दिसत आहेत. 20 फेब्रुवारीला दुपारी सवातीन वाजता नापा काऊंटच्या शेरिफ कार्यालयाने बेरीएसाजवळ त्यांचा मृतदेह मिळाल्याचे सांगितले.

दिल्लीचे नाव 'इंद्रप्रस्थ' करा, भाजप खासदाराची मागणी

केंद्र सरकारने केरळ राज्याचे नाव केरलम ठेवण्याला मंजुरी दिल्यानंतर आता दिल्लीचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपचे खासदार प्रवीण खंडेलवाला यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की, दिल्लीचे नाव बदलून इंद्रप्रस्थ करावे. यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्रही पाठवले आहे. खंडेलवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनाही पत्र पाठवले आहे. दिल्ली विधानसभेत दिल्लीचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

नॉर्वेच्या माजी पंतप्रधानांचा आत्महत्येचा प्रयत्न

नार्वेचे माजी पंतप्रधान थोरब्योर्न जगलँड यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एपस्टीन फाईलमध्ये नाव आल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचा दावा केला जात आहे. लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांच्याशी त्यांच्या संबंधांवरून सध्या चौकशी सुरू आहे. जगलँड यांच्यावर ‘एग्रेवेटेड करप्शन’ म्हणजेच गंभीर भ्रष्टाचाराचाही आरोप आहे, ज्यात जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप निश्चित झाला असला तरी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Comments are closed.