WIvsSA सामन्याने भारताच्या सेमीफायनल एंट्रीवर होणार परिणाम, कोणाच्या पराभवाने टीम इंडियाला फायदा?

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (गुरूवार, २६ फेब्रुवारी) सुपर-८चे दोन सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये पहिला सामना वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे, तर दुसरा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे असा होणार आहे. उपांत्य फेरीच्या दृष्टीकोनातून हे दोन्ही सामने महत्वाचे आहेत. वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात जो जिंकेल तो उपांत्य फेरीत पोहचणार, दुसरीकडे भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात जो हारेल तो स्पर्धेबाहेर जाणार. हे चारही संघ एकाच गटात (पहिला) असल्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याचा भारताला कसा फायदा होईल हे जाणून घेऊ.
वेस्ट इंडिजविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला तर याचा थेट फायदा भारताला होणार आहे. वेस्ट इंडिजने पराभूत झाल्यावर त्यांचे २ अंक कायम राहणार आहेत, मात्र त्यासाठी भारतालाही झिम्बाब्वेला पराभूत करावे लागणार आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहचणार. तसेच १ मार्चला होणारा वेस्ट इंडिज विरुद्ध भारत सामन्यात जो जिंकेल तो मग उपांत्य फेरीत पोहचेल.
तसेच वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला हरवले तर भारताच्या अडचणीत वाढ होईल. आधीच दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाल्याने भारताच्या नेट रनरेटवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. भारताने त्यांचे पुढील दोन्ही सुपर-८चे जिंकले तरी नेट रनरेट अडसर ठरणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात झिम्बाब्वे जिंकला, तर त्याचाही भारताला फायदा होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेला पराभूत केले तर भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या तिन्ही संघांचे अंक २-२ असे होतील. त्यामुळे यामध्ये ज्या संघांचा नेट रनरेट उत्तम ते उपांत्य फेरीत पोहोचतील.
या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सुपर-८च्या गट-२ मधील इंग्लंड पोहोचला आहे. तसेच न्यूझीलंडचेही स्थान जवळपास निश्चित झाले आहे. यजमान श्रीलंका मात्र दोन्ही सुपर-८चे सामने गमावत स्पर्धेबाहेर झाला आहे.
Comments are closed.