टीम इंडियाला केलेली एक चुकही पडेल महागात, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी अक्षर-संजू पतरणार संघात!

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (२६ फेब्रुवारी) सुपर-८चे दोन सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिला सामना दुपारी वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा आहे. दुसरा सामना सायंकाळी ७ वाजता भारत विरुद्ध झिम्बाब्वे चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे. या दोन्ही सामन्यांवर सर्व भारतीय चाहत्यांचे लक्ष असणार आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत केले फायदा भारताला आहे, मात्र त्याचबरोबर भारतालाही विजय मिळवणे आवश्यक आहे. या सामन्यासाठी भारताच्या अंतिम अकरामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. अक्षर पटेल पुन्हा संघात परतणार हे जवळपास निश्चित आहे.

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मतानुसार, भारताच्या दुसऱ्या सुपर-८च्या सामन्यात अक्षरला संघात घेतले पाहिजे. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बाकावर बसवले होते, संघ व्यवस्थापकांच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यामुळे भारताच्या कर्णधार सूर्यकुमार यादववरही टिका झाल्या होत्या. त्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला खेळवले गेले होते.

शास्त्रींच्या मते, झिम्बाब्वेविरुद्ध सुंदर आणि पटेल दोघांनाही खेळवा. यावर ते पुढे म्हणाले, “अक्षरला संघात परत आणावेच लागेल. संघाच्या त्याच्या अनुभवाची आवश्यकता आहे. त्या दोघांनाही खेळवले तर एखादा गोलंदाज चांगली कामगिरी करत नसेल तर तेव्हा संघाकडे आणखी एक पर्याय उपलब्ध राहिल. तसेच अक्षर आठव्या क्रमांकावर फलंदाजीही करू शकतो.”

झिम्बाब्वेच्या संघात केवळ दोनच फलंदाज डावखुरे असून ते सलामीवीर आहेत. यामुळे अक्षरच्या खेळण्याच्या संधी अधिक आहेत. तसेच संजूनेही विकेटकीपींग आणि फलंदाजांची नेटमध्ये कसून सराव केला आहे.

भारताला आजच्या सामन्यात केलेली एक चुकही महागात पडणार आहे. त्यासाठी नीट विचाराने संघ निवडावा लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारताचा नेट रनरेट -३.८०० असा झाला आहे. त्यासाठी आजच्या सामन्यात मोठा विजय आवश्यक आहे. भारताची सलामीची जोडी अपयशी ठरत असल्याने संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग ईलेवन– सूर्यकुमार यादव (कर्ंधर), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

Comments are closed.