चांदी 5000 रुपयांनी स्वस्त, सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
नवी दिल्ली : सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. दुसरीकडे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये देखील सुरुवातीला थंड प्रतिसाद दिसून आला. सोने आणि चांदीच्या दरात सुरु असलेल्या तेजीला आज ब्रेक लागला. एमसीएक्सवर आज ट्रेडिंग सुरु होताच चांदीचे दर 5000 रुपयांनी घसरले. त्याचवेळी सोन्याचे दर देखील कोसळल्याचं पाहायला मिळालं.
चांदीचे दर घसरले
कमोडिटी मार्केटमध्ये गुरुवारी चांदीच्या रात घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर चांदीचा दर बुधवारी 278364 रुपये होता. त्यात आज 5804 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. चांदीचा दर आज 272560 रुपयांवर आला. चांदीच्या दरानं 29 जानेवारीला 4 लाख 20 हजार 48 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत चांदीचे दर 1 लाख 47 हजार 488 रुपयांनी कमी झाले आहेत.
सोन्याच्या दरात घसरण
चांदीच्या दरात घसरण झाली आहे, त्याप्रमाणं सोन्याच्या दरात देखील घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 2 एप्रिलच्या वायद्याचे सोन्याचे दर 160516 वर पोहोचले होते. बुधवारी एमसीएक्सवर सोन्याचादर 161145 प्रति तोळा इतके होते. म्हणजे आज सोने 629 रुपये कमी होते. सोन्याच्या दरानं देखील 29 जानेवारीला 1 लाख 93 हजार 96 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सोनं सध्या 32580 रुपयांनी घसरले आहेत.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं जारी केलेल्या दरांनुसार 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 159040 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 155230 रुपये आहे. 20 कॅरेट सोनं 141550 रुपये एक तोळा आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दराचा विचार केला असता एका तोळ्यासाठी 128830 रुपये मोजावे लागतील. तर, 14 कॅरेट सोन्याचा दर 102580 रुपये मोजावे लागतील. आयबीजेएकडून दिवसातून दोन वेळा सोन्याचे दर जाहीर केले जातात. हे दर जीएसटी आणि मेकिंग चार्जेस शिवायचे असतात.
शेअर बाजारात काय घडलं?
एकीकडे सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्याच प्रमाणं शेअर बाजारात देखील आज तेजी आणि घसरणीचा ट्रेंड पाहायला मिळाली. सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी दिसून आली.मात्र, त्यानंतर लगेचच घसरण झाली. सेन्सेक्स आज 27.46 अंकांच्या घसरणीसह 82248.61 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 14.05 अंकांच्या तेजीसह 25496.55 अंकांवर बंद झाला.
आणखी वाचा
Comments are closed.