अभिषेक शर्माला प्लेइंग 11 मधून बाहेर करा; सामन्यापूर्वी दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाला सल्ला!

टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये चमकदार कामगिरी केली आणि सर्व ४ सामने जिंकून सुपर ८ मध्ये आपले स्थान निश्चित केले. मात्र, सुपर ८ च्या पहिल्याच सामन्यात संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामुळे आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारतीय फलंदाजी आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे अपयशी ठरली आणि एकही फलंदाज लयीत दिसला नाही. संघाचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माचा फॉर्म सध्या संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीत एका भारतीय दिग्गजाने टीम इंडियाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
च्याभारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला एक मोठी सूचना दिली आहे. ‘क्रिकबझ’शी बोलताना त्याने अभिषेक शर्माला या सामन्यातून विश्रांती देण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला की, “मी जर तिथे असतो, तर अभिषेक शर्माला ब्रेक दिला असता आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी दिली असती. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना या चाचणीसाठी शेवटची संधी असेल. जर हा सामना हरलात, तर शेवटच्या सामन्यात कुणालाही खेळवा. त्यामुळे या सामन्यात फॉर्ममध्ये असलेल्या ११ खेळाडूंनाच मैदानात उतरवा.”
च्याअभिषेक शर्माने या स्पर्धेत आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत, ज्यापैकी ३ सामन्यांत तो खाते न उघडताच बाद झाला आहे, तर एका सामन्यात त्याने १५ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, संजूला आतापर्यंत केवळ एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये त्याने ८ चेंडूंचा सामना करत २२ धावांची खेळी केली होती.
च्यायासोबतच वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाला फलंदाजीच्या क्रमातही बदल करण्याचा सल्ला दिला आहे. सेहवागच्या मते, “सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरावे लागेल, तर तिलक वर्माने चौथ्या क्रमांकावर यावे. अशा परिस्थितीत डाव्या आणि उजव्या हाताच्या (Left-Right combination) जोडीनुसार फलंदाजांना उतरवावे लागेल आणि त्यांनी मोकळेपणाने फलंदाजी करणे आवश्यक आहे. सध्या असे वाटते आहे की टीम इंडिया दबावाखाली खेळत आहे आणि फलंदाजांना बाद होण्याची भीती वाटत आहे.”
Comments are closed.