Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं

Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव  कुणाला कळल नसतं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल फटेल यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या आठवणींन उजाळा दिला. 2014 ला अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबादारी टाकली होती. यावेळची आठवण मुंडे यांनी यावेळी सांगितली. माझा प्रदीर्घ सहवास नसला तरी 15 वर्ष मी अजितदादा यांच्यासोबत होतो. 2014 साली मला त्यांनी विरोधी पक्षनेते पद दिलं होतं. ज्यावेळी आपण विरोधात होतो, अनेक मान्यवर त्यावेळी होते. जबाबदारी सांभाळणारे अनेक दिग्गज होते. परंतू, तरीदेखील मला संधी देण्यात आली. ती मिळाली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. 2014  ते 2019 पाच वेळा यात्रा निघाल्या. हे फक्त त्याच काळात झालं. 2019 मधे संख्या वाढली. आज दादा आपल्या सोबत नाहीत. आज वहिनी तुमच्यात आम्ही दादांना पाहत आहोत असे मुंडे म्हणाले.

Comments are closed.